Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढले...दुर्मीळ वृक्ष, वनौषधी, वन्यप्राणी, रानमेवा नष्ट होण्याची भीती

मावळ जनसंवाद:- उन्हाच्या झळा वाढतच चालल्या असल्याने जागोजागी असणारे गवत वाळत असून, थोडीसी उडणारी आगीची ठिणगी देखील आग पसरण्यास कारणीभूत ठरत आहे. पसरणाऱ्या आगीची झळ जंगलाला लागत असल्यामुळे आगी लागण्याचे प्रमाण उन्हाळ्यात वाढत असून, त्यामुळे दुर्मीळ वनस्पती, वनौषधी, रानमेवा, वन्यप्राणी यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतातील साफसफाई करताना गोळा होणारा पालापाचोळा जाळताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे. उन्हाच्या झळा वाढत असल्याने सर्वत्र गवत वाळू लागले आहे. ग्रामीण भागात भात पिका नंतर वाटाणा हे पीक घेऊन वाटाणा काढणीला आला आहे. काही ठिकाणी वाटाणा काढून पुढे भात पिकासाठी शेत मशागत करीत आहे.

काही शेतकरी  रानातील पाला गोळा करून भात पीक पेरणी पूर्वी दाढ भाजणी काही शेतकरी करीत आहे.आंबाचा हंगाम सुरू होण्यास काही दिवस राहिले असल्याने आंबाच्या बागेबरोबर ऊसतोड झालेल्या शेतातील पालापाचोळा याची साफसफाई जोरात सुरू आहे.हा पालापाचोळा गोळा करून वेळीच जाळण्यात देखील येत आहे. काही आंबा उत्पादकांच्या बागा जंगलाच्या पायथ्याला असल्याने जाळण्यात येणाऱ्या पालापाचोळ्याची ठिणगी उडून जंगलात पसरत असून त्यामुळे जंगलांना आगी लागत आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला असणारे वाळलेले गवत अतिउत्साही पर्यटकांकडून मजेत पेटविण्याचे प्रकार देखील जंगलाना आगी लागण्यास कारणीभूत ठरत आहे.


Post a Comment

0 Comments