मावळ जनसंवाद:- मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाशाची सोय होऊन विजेची बचत व्हावी, म्हणून महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वाची योजना आखली होती. ग्रामीण भागातील लोकांना अंधारापासून मुक्ती मिळावी म्हणून गावखेड्यात सौर दिवे लावण्यात आले. मात्र, काही कालावधीतच सौरऊर्जेचे दिवे बंद पडल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी फक्त रिकामे खांब दिसून येत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील सौर ऊर्जा दिव्यांचे खांब शोभेची वस्तू बनली आहे.विजेची बचत व्हावी म्हणून शासनाकडून सौरऊर्जेच्या दिव्यांचा पुरवठा केला जातो. परंतु, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात फार कमी प्रमाणात सौर दिवे सुरू असले तरी उर्वरित दिवे कायमचे बंद आहेत. सौर दिवे लावल्यानंतर त्यांच्या नियोजनाची जबाबदारी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवकांची होती. मात्र, याकडे शासनाने दिलेल्या दिव्यांचे खांब शोभेची वस पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी व ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तालुक्यातील अनेक गावांत सौर दिवे बंद असल्याने सौर ऊर्जेच्या दिव्यांचे तीनतेरा झाल्याचे दिसून येत आहे. काही कालावधीनंतर सौरप्लेट, बॅटरी चोरीला जाणे, नादुरुस्त झाल्यावर दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतींकडून माहिती न घेणे, ग्रामपंचायत स्तरावर किती सौर ऊर्जेचे दिवे आहेत. याकडे गटविकास अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
0 Comments