मावळ जनसंवाद:- पुणे जिल्ह्यात मधमाशी पालनाला भरपूर वाव आहे. परंतु शासनाकडून प्रोत्साहन मिळत नसल्याने अनेक बेरोजगारांना या व्यवसायाकडे वळता येत नाही. मावळ तालुक्यात काही तरुणांना या व्यवसायासाठी मध माशी पालनासाठी शासनाकडून मधमाशी पेठ्या देण्यात आले होत्या. मात्र मावळ तालुक्यात भरपूर जंगल क्षेत्र असूनही या व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. पुणे जिल्ह्यात विविध प्रकारच्या वनस्पती उदा. करवंद, जांभूळ,आंबा, फणस, आदी वनस्पती तसेच शेतातील पिके या पासून नैसर्गिकरीत्या जंगलात मध उपलब्ध होतो. मावळ तालुक्यातील खेडे गावातील अनेक शेतकरी, आदिवासी बांधव, शेतमजूर जंगलातील मध गोळा करतात. या लोकांना शास्त्रशुद्ध मधमाशी पालन करता यावे, यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना राबविली जाते. यासाठी अनुदानसुद्धा दिले जाते. सदर योजनेच्याबेरोजगारांना मधमाशी पालनासाठी 50 टक्के अनुदान मधमाशी पालनासाठी शासनाकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत अनुदान दिले जाते. योजनेंतर्गत मधमाशी केंद्र योजनेतून 50 टक्के अनुदानसुद्धा उपलब्ध होते. व्यवसायासाठी प्रशिक्षण तसेच साहित्य खरेदीसाठी अनुदानाचा वापर करता येतो.
(येथे करा अर्ज
मध केंद्र योजनेचा लाभ घेण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार किंवा संस्थांना अर्ज सादर करता येतो. येथे प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेता येते)
(यांना करता येतो अर्ज
१) मधमाशी पालन योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना अर्ज सादर करता येतो. या व्यवसायासाठी त्यांना जमीन असणे आवश्यक आहे.
२) सुशिक्षित बेरोजगारसुद्धा योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करू शकतात. योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार थाटता येतो.
३) नोंदणीकृत संस्था, बचतगट आदी सुद्धा योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करू शकतात. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन आहे)
0 Comments