Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

वणव्यांमुळे डोंगर झाले उघडे बोडके...

मावळ जनसंवाद:- वृक्षतोडीमुळे वनसंपदा नष्ट होत असताना अडमुठ्या लोकांकडून डोंगराला वणवे लावण्याचे प्रकार सुरु आहेत. यामुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. अन्नसाखळी खंडित होत आहे. जंगली प्राण्यांचा वावर डोंगराकडून गावाकडे वाढला आहे. वनव्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. वन विभागाकडे बोट दाखवून नागरिक आपली जबाबदारी झटकत आहेत.उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. यंदा थंडी कमी जाणवल्याने उन्हाळ्याच्या झळा तीव्र असणार आहेत. मावळ तालुका हा विपुल साधन संपदेने नटला आहे. बहुतांशी लहान मोठी गावे, वाड्या वस्त्या डोंगरावर, डोंगर उतारावर व डोंगर कपारीत पसरल्याआहेत. डोंगराळ भाग असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असते. वातावरण बदलामुळे काही वेळा पावसाळा कमी झाला तरी वनसंपदा मात्र टिकून असते. 

डोंगर परिसरात अनेक दुर्मिळ व औषधी वनस्पती दिसून येतात. या परिसरात शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. अतिवृष्टीमुळे डोंगर परिसरात मुबलक प्रमाणात गवत मिळत असल्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणावर पशु पालन केले जाते.मावळ तालुक्यातील डोंगर भागात मोठ्या क्षेत्रात वन विभागाचे डोंगर आहेत. तर काही डोंगर खाजगी मालकीचे आहेत. वन विभागाने त्यांच्या हद्दीतील डोंगरावर विविध झाडे लागवड केली असून काही ठिकाणी पाणी जिरवण्यासाठी डोंगरावर पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवलेली असून त्यातून वनिकरण फुलवले आहे.

खाजगी डोंगर हे उघडे बोडके दिसून येतात. गवत जाळल्यानंतर पुढच्या वर्षी चांगले गवत येईल, अंधश्रद्धा व अन्य कारणाने दरवर्षी खाजगी डोंगराना वणवे लावले जात आहेत. पण नंतरहीच आग पसरत जाऊन वनविभागाच्या हद्दीत जाते. यामुळे गवतबरोबर वृक्षारोपण केलेल्या क्षेत्रालाही झळ बसते. वन विभागाचे कर्मचारी आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने मर्यादा येत असून दरवर्षी डोंगरांना वणवे लावले जात असल्याने अनेक जिवजंतू, किटक, सरपटणारे प्राणी, पशू-पक्षी व त्यांचा अधीवास आगीत जळून जात आहे. गवत वाळल्यानंतर नवीन गवत उगवावे यासाठी डोंगर पेटविले जातात.

(लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे...

वणव्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. मावळ तालुक्यात डोंगर परिसरात अथवा विभागात काही वर्षात मानव व वन्य जीवांचा संघर्ष सुरू होईल अशी परिस्थिती आहे. यासाठी वनविभाग व नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करणे अवश्यक आहे. जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तो पर्यंत हे प्रकार थांबणार नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी वनविभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्या ऐवजी लोकांनीच वणवे लावणाऱ्यांवर जरब बसविण्याची गरज आहे.अशी माहिती कांबरे ना.मा गावचे उपसरपंच मारुती शंकर गायकवाड यांनी दिली)

वणवा आटोक्यात आणण्याची जबाबदारी फक्त वन विभागाची आहे, अशी लोकांची धारणा आहे. आपले वन, आपली जवाबदारी अशी जागृती लोकांनी दाखवली तर वणवे रोखण्यात व भविष्यातील धोके टाळण्यात यश येणार आहे.वणवा आटोक्यात आणण्याची जबाबदारी फक्त वन विभागाची आहे, अशी लोकांची धारणा आहे. आपले वन, आपली जवाबदारी अशी जागृती लोकांनी दाखवली तर वणवे रोखण्यात व भविष्यातील धोके टाळण्यात यश येणार आहे.


Post a Comment

0 Comments