मावळ जनसंवाद:- औषधांमध्ये सर्वात गुणकारी व पौष्टिक भाजीपाला म्हणून शेवग्याच्या शेंगांकडे पाहिले जाते. आरोग्याला संजीवनी देणारा आरोग्यवर्धक शेवगा हा फुल व शेंगानी बहरला आहे. त्यामुळे आरोग्याला संजीवनी देणारा म्हणून शेवग्याच्या शेंगांकडे पाहिले जाते. नाणे मावळातील मुख्य बाजार पेठ कामशेत या ठिकाणी विविध भाजीपाल्यासह आरोग्यासाठी अत्यंत पोषक शेवग्यांच्या शेंगा असून हिरवा भाजीपाला, लाल टमाटर, मोड आलेली मटकी हैं जेवढ्या प्रमाणात शरीरासाठी आवश्यक आहे, त्याचबरोबर आरोग्यवर्धक शेवग्याच्या शेंगाही शरीरासाठी उपयुक्त व आवश्यक आहे. आयुर्वेदात शेवग्याच्या फुलाला व शेंगाला महत्वाचे स्थान आहे. बहुतांश नागरिक शेवग्याच्या पानाचा रस काढून प्राशन करतात. तर अनेकजन शेवग्याच्या फुलांची भाजी करून त्याचा आस्वाद घेतात. तर अनेक महिला या फुलांना दह्यात मिसळून खातात. तर काही हॉटेल मध्ये शेवगा फ्राय बनवले असतात.
लांबलचक वाढलेल्या शेवग्याच्या शेंगाची तुरीच्या डाळीत शेंगदाण्याच्या चटणीत बारीक करून भाजी करतात. रक्तदाब, शुगर, अशक्तपणा व विशेषतः ज्या व्यक्तीच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे. त्यांच्यासाठी शेवग्याच्या शेंगा रामबाण असून आजार नियंत्रणात आणते. दुधापेक्षाही दहापट या शेवग्यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याचे जाणकार सांगतात.
0 Comments