मावळ जनसंवाद:- रब्बी पिकाच्या हंगामाला जोमात सुरवात झाली असून; पिकाची लागवड मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. पीक मोठ्या जोमाने फुलू व डोलूही लागले आहे. मात्र पिकावर मोठया प्रमाणात वन्य प्राण्यांचे अतिक्रमण सुरू असून; पिकांचे नुकसान करायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे पिकांच्या बचावासाठी काय करावे? या विवंचनेत असताना शेतकरी राज्याने पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांच्या सभोवताल फाटक्या साड्यांचा आधार घेत खुटे गाडून साड्यांची एका रेषेत लाईन लावून बांधल्या. त्यामुळे वन्यप्राणी हे रात्रीच्या अंधारात या साड्यांना आदळतात आणि परत फिरतात. त्यामुळे नुकसान होत नाही, ही नामी शक्कल शेतकऱ्यांनी लढवून पिकांना फाटक्या साड्यांचा आधार दिला आहे.

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जंगल व्याप्त शेत शिवारात नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर सुरू असते. नेहमीच या क्षेत्रात तसेच इतर अनेक क्षेत्रात पिकांची लागवड केली जाते. वन्यप्राण्यामुळे खूप मोठे पिकांचे नुकसान होते. यात सांबर, रानडुक्कर, ससे, तसेच अनेक इतर प्राणी लाख, हरभरा, जवस शेतातील पाळीवर असलेली तुरी, ज्वारी, मका, भुईमुंग, वाटाणा, हरभरा, ऊस तसेच अनेक प्रकारचे पीक यावर अतिक्रमण करून मोठया प्रमाणात नुकसान करतात. त्यामुळे फाटक्या साड्यांना सदर प्राणी आपटले की ते परत जातात आणि पिकांचा प्राण्यापासून बचाव होते. तेव्हा ही नामी शक्कल शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तरीही वन्यप्राणी पिकांचे नुकसान करतातच, अशी माहिती शेतकरी वर्गांनी दिली आहे. मात्र फाटक्या साडीच्या आधाराने पिकाचे रक्षण होऊन शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळून दिलासा मिळतो एवढेच
0 Comments