मावळ जनसंवाद:- मावळ तालुक्यातील आंबा बागायतींमध्ये यंदा मोहोराने बागायतदारांची आशा पुन्हा एकदा बल्लवित केली आहे. वातावरणातील बदलांमुळे यंदा आंबा पीक धोक्यात आले असतानाच थंडी वाढल्याने कलमांवर आंबा मोहोर दिसू लागला आहे. एप्रिल ते मे महिन्यात या संपूर्ण तालुक्यात एक अत्यंत चांगला आंबा उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदा चार हजार टन आंब्याचे उत्पादन होईल, अशी अपेक्षाही बागायतदारांनी व्यक्त कली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाच्या संकटांनी या भागातील आंबा उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागला होता. मागील वर्षी तौक्ते चक्रीवादळामुळे आंब्याच्या अनेक झाडांची पडझड झाली होती. तरीही, ना आपत्तीनंतर बागायतदारांनी झाडांची निगा राखून, नव्या आंब्याच्या लागवडीवर जोर दिला आहे. आता जेव्हा मोहोर आली आहे, तेव्हा बागायतदार आणि शेतकरी वर्ग एकाच सुरात उत्साही आणि आनंदी दिसत आहेत. आंब्याच्या मोहोराची प्रक्रिया नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत सुरू होते. या मोहोरांच्या माध्यमातून आंब्याच्या फळांचा आकार व गुण वत्ता ठरते. मोहोर आले की साधारणपणे १०० ते १२० दिवसांत आंबे फळ धारण करण्यास तयार होतात. या वर्षी वातावरण अत्यंत अनुकूल असून, बागायतदारांना आंब्याच्या उत्पादनाबाबत पूर्ण विश्वास आहे. मावळ तालुक्यातील डोंगर उतार आणि वरकस पडीक जमिनी आंब्याच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा देखील असा विश्वास आहे. यंदा आंब्याचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा आणि विश्वास बागायतदारांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे.
मावळ तालुक्यात यंदा चार हजार टन आंबा उत्पादनाची अपेक्षा आहे, आणि एप्रिल ते मे दरम्यान फळ काढणीसाठी योग्य वातावरण आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसानीनंतर पहिल्यांदाच आंब्याच्या उत्पादनासाठी अनुकूल हवामान आहे, ज्यामुळे बागायतदारांना आशा आहे की यंदा उत्पादनात चांगली वाढ होईल अशी प्रतिक्रिया श्री.हनुमंत चोपडे पाटील यांनी दिली.
0 Comments