Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे मावळातील शाळा परिसर सीसीटीव्हीत कैद होणार तरी कधी ?

मावळ जनसंवाद:- मावळ तालुका हा मुंबई पुणे हवे लगत असून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग नगरी वाढत आहे पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही बाब भारत देश स्वतंत्र होऊन आजच्या धावत्या युगात सुरक्षेची बाब प्रलंबित आहे.तसेच मावळ तालुक्यात विविध उद्योग नगरीमध्ये अथवा कंपनीमध्ये विविध कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मावळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या १७ व्या वित्त आयोग आणि विविध फंडातून गावच्या दृष्टीने गरजेचे असणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देण्याचा ध्यास ग्रामपंचायत मार्फत घेण्यात येतो मात्र सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब गांभीर्याने घेत नाही ही वस्तुस्थिती अथवा मावळ तालुक्यात काही ठिकाणी शाळेमध्ये सीसीटीव्ही हे बसवण्यात आलेले आहे परंतु काही शाळेमध्ये कोणत्याच प्रकारचे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही.                                              समाजात अनेक ठिकाणी शाळा माध्यम या ठिकाणी अनेक अनौपचारिक प्रसंग घडत असतात त्या अनुषंगाने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात यावा ची मागणी पालकांकडून होत आहे. जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील प्रमुख रस्ते व गावातील चौक परिसरात सीसीटीव्ही च्या कक्षेत आणण्यासाठी कॅमेरे ठिकठिकाणी बसवण्यात यावे. यामुळे बाहेरून येणा-जाणारे परिचित अपरिचित चेहरे कॅमेऱ्याच्या माध्यमातून चोहोबाजूने कैद होणार आहेत. त्यामुळे एखादी बरी वाईट घटना अथवा आक्षेपार्थ हालचाली यामध्ये कैद होणार असून तपासाच्या दृष्टीने या कॅमेऱ्यांची चांगलीच मदत होणार आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शालेय परिसर व संपूर्ण गाव सुरक्षाच्या दृष्टीने परिपूर्ण राहणार आहे. प्रामुख्याने गावाची गरज ओळखून प्रशासनाने तात्काळ जिल्हा परिषद शाळा तसेच शालेय अथवा गाव चौकात/ परिसर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.

Post a Comment

0 Comments