मावळ जनसंवाद :- नाणे मावळ परिसरात गेल्या आठवड्यात पासून थंडीचा कडाका वाढला होता. नाने मावळ हा परिसर डोंगर दर्यात अथवा धरण परिसरात व नदी नाले यांच्या दरम्यान बसलेला आहे. शिवाय नाणे मावळ परिसरात मागील आठवड्यात तापमान खाली आल्याने वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला होता. परंतु, सध्या आकाशात ढगांची गर्दी असल्याने या ढगांच्या चादरीमुळे थंडीचा गारठाच राहिलेला नाही. परिणामी, या आठवड्यात थंडी ओसरली असून ती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.सूर्य मावळतीला गेल्यावर मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढत होता. पहाटे तर अंगावरील शहारे उभे होत हुडहुडी भरेल, अशीच थंडी नाने मावळात होती. रात्रीच्या सुमारास आणि सकाळी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या. विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक ठिकठिकाणी शेकोट्यांवर क्षणभर विश्रांती घेत ऊब घेताना दिसत होते. पण, या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरल्याचे चित्र पहावहास मिळत आहे. थंडीचा वाढता जोर लक्षात घेता नागरिकांनी थंड घरात राहण्याचे टाळावे, शिवाय, शरीराची उष्णता कमी होऊ नये, यासाठी डोके, मान, हात आणि पाय झाकण्यासाठी उबदार व सैल कपडे परिधान करावे पहाटे आणि रात्रीला तापमान कमी राहत असल्याने यावेळी घराबाहेर पडण्याचे टाळावे, शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गरम पेय प्यावी असे डॉक्टर सांगतात.
जनावरांची काळजी घेणे जरुरीचे
कडाक्याच्या थंडीत मुक्या प्राण्यांना ऊब मिळण्यासाठी उबदार घोंगडधांसह गोठ्यालगत शेकोट्या पेटवून शेकोटीचा आधार दिला जातो. थंडीच्या दिवसांत मुक्या जीवांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका
ग्रामीण भागात सध्या रब्बीची पेरणी आटोपली असून या पिकाला पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांनी सुरू केल्याने ग्रामीण भागात अधिकच गारठा वाढला आहे. पण, हरभरा, गहू, वाटाणा अदी पिकाला थंडी अधिक पोषक असते. मात्र, ढगाळ वातावरण धोकादायक ठरून पिकांना फटका बसण्याची शेतकऱ्यांना भीती आहे.
0 Comments