मावळ जनसंवाद :- नवचैतन्य आणणारा ऋतू या ऋतूच्या उत्तरार्धात सुरू होतो तो सृष्टीचे नवचैतन्य बहरणारा वसंत हृदयी वसंत फुलताना .... हृदयी वसंत फुलताना.. हे मराठी चित्रपटातील गीत ऐकले नाही असा मराठी माणूस आणि वसंत ऋतूत फुलांचा बहर अनुभवला नाही असा निसर्गप्रेमी शोधून सापडणार नाही. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा काळ म्हणजे वसंत ऋतू. सतत घामाच्या धारा शरीरा वाटे बाहेर काढणाऱ्या या महिन्यात सुर्यदेवता सर्व प्राण्यांना आणि निसर्गाला मुक्त हस्ते भरपूर सूर्यप्रकाश देते. याच सूर्यप्रकाशात निसर्गाची मुक्त हस्ते उधळण होते. अवनीवरती वसंताचे आगमन होते. भरपूर सूर्यप्रकाश मिळाल्याने रानावणाला बहर येतो. शिशिरात निष्पर्ण झालेली वनदेवता हिरव्या कोंबात येते. हिरव्या पानांच्या वनस्पती बहारदार अशी फुलांची उधळण करतात. लाल, पिवळी, केशरी, जांभळी, पांढरी अशा कितीतरी रंगांची फुलं माळराणी फुलून येतात. पळस, पांगारा, शेवरी, गुलमोहोर नखशिखांत बहरून येतो आणि पाहणार्याचे हृदय वसंताने फुलून येते.वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे भारतीय ऋतू निसर्गातील विविध बदलांची नांदी देतात. बारा महिन्यातील विभागून ऋतूचक्र सांगणारे हे ऋतू निसर्गाची विविध रूपे समोर आणतात. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशिर्ष आणि पौष या महिन्यात शिशिर ऋतू असतो. म्हणजेच डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध, जानेवारी महिना व फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्धात शिशिर ऋतू असतो. या ऋतूचे वैशिष्टय म्हणजे 'झाडांची पानगळ' झाडांची पानगळ सुरू झाली कि शिशिर ऋतू सुरू झाला असा जनमानसात समज आहे. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिन्याच्या ८ तारखेपर्यंत लांबलेल्या पावसाने निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलवून टाकले होते, मात्र ठराविक काळानंतर येणारे ऋतूचक्र सतत सुरू असून शिशिर ऋतूने पानगळीला सुरूवात केली आहे. मोठया पानांच्या झाडांची पाने या ऋतूत गळतात. झाडे पूर्णपणे निष्पर्ण होतात. काहीसं भकास उदास असं माळरानाचं चित्र या ऋतूत दिसून येते. निसर्गाला नवे रूप देणारा हा ऋतू शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही महत्वाचा मानला जातो. जानेवारी फेब्रुवारी महीन्यात असणारा हा ऋतू थंडीचा ऋतू म्हणूनही ओळखला जातो. या वर्षी मात्र या ऋतूत जाणवणारी थंडी गायब झाली आहे. दरवर्षी प्रमाणे जाणवणारा गारवा हारवला आहे. मात्र या शिशिराची पानगळ झाली असून झाडांची पाने पिवळीगर्द होवून गळण्यास सुरूवात झाली आहे. काहीसा उदास वाटणारा हा ऋतू गारावा थंडी आणि पानगळ घेऊन सणही ऋतूमानाचा विचार करून आहार विहार देतात. मकरसंक्रात हा त्यातीलच महत्वाचा सण. उत्तम आरोग्यासाठी स्निग्ध पदार्थ खाण्याचा, थंडीचे कपडे, हलका व्यायाम आणि आरोग्यदायी आहार सांभाळून या ऋतूत आरोग्याची काळजी घेतली जाते. झाडांची झालेली पानगळ शेतकऱ्यां नाराब देवून जाते.निसर्गाला नवे अंकूर देणारा 'जूनं जाऊ द्या मरणालागुनी' म्हणणारा हा ऋतू वसंताची चाहूल देतो. निष्पर्ण झालेल्या फांदीतून रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ याच ऋतूच्या अखेरीस पहावयास मिळतात. एका अर्थाने नवसर्जनास पार्श्वभूमी निर्माण करणारा विरक्तीचा संदेश देणारा हा ऋतू वसंताची चाहूल देतो.
0 Comments