मावळ जनसंवाद :- नाणे मावळ हा परिसर डोंगराळ आहे. येथील बहुतांशी गावे ही डोगर पायथ्याशी आहेत. दर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. यामुळे या परिसरात नेहमीच वित्तहानी होत असते. त्यातच वाढते औद्योगिकीकरण, लोकसंख्या वाढ, दळणवळण, शहरीकरण, प्रदूषण यामुळे जैविक घटकांचा हास होऊ शकतो. तसेच तळे नद्या, जंगले, डोंगर यांचाही मानवी हस्तक्षेपामुळे हास होऊ शकतो. यामुळे शासनाकडून इको सेन्सिटीव्ह झोन जाहीर केला.
मावळ तालुक्यातील ५१ गावे ही इको सेन्सिटीव्ह झोन म्हणून घोषित आहेत. नाणे मावळातील पश्चिम भाग इको सेन्सिटीव्ह झोन असताना देखील अथवा बांधकामावरती बंदी असताना या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम होत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी वन विभागाच्या जमिनी वरती बेकायदेशीरपणे माती चोरून ती माती गार्डन या ठिकाणी घेऊन जातात.तसेच पार्टी वाल्यांच्या जमिनीमध्ये रात्री अपरात्री मुरूम चोरून नेत असतात. त्यातून लाखो रुपये कमवत आहे. त्यामध्ये शासनाची कोणती रॉयल्ली अथवा परवानगी नसते तसेच पीएमआरडीएची परवानगी न घेता फार्म हाउस, स्विमिंग पूल, बंगलो, हॉटेलची बांधकामे सुरू आहेत. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या भागात फार्म हाउसला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने धनदांडगे लोक, बिल्डर्स बेकायदेशीर डोंगरावर तसेच ओढ्यावरती व वाडीवळे धरण परिसराच्या लगत बांधकाम करीत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अशा बांधकामांची वनविभाग, तलाठी, ग्रामसेवक व कोतवाल यांच्या माध्यमातून पाहणी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नाणे मावळातील पश्चिम भाग डोंगराळ आहे. मानवी हस्तक्षेपामुळे येथील नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होऊ नये म्हणून शासनाने येथील काही भागाला 'इको सेन्सिटिव्ह झोन' म्हणून घोषित केले आहे. मात्र या भागात कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस, बंगलो, स्विमिंग पूल, यांची कामे सुरू आहेत. या बांधकामांवर प्रशासन कारवाई करणार आहात का? हे पाहणे महत्त्वाचे राहील अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0 Comments