Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

राईस मिलवर शेतकऱ्यांची लगबग...

मावळ जनसंवाद :-  मावळ तालुका हा भात पिकासाठी अग्रेसर आहे मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग भात हे पीक घेतले जाते.मावळ तालुक्यात खरीप हंगामात भात हेच मुख्य पीक घेतले जाते.मावळ तालुक्यातील नाने मावळ, पवन मावळ, अंदर मावळ  या तीन मावळा मध्ये मागील  महिन्यापूर्वी  या ठिकाणी भात पिकाची काढणी पूर्ण झाली असून शेतकरी वर्ग आपापल्या शेतातील भात हे गिरणीमध्ये अथवा राईस मिल मध्ये भरण्यासाठी घेऊन जात आहे.        

                  मावळ तालुक्यात भात गिरण्या या मुबलक असल्यामुळे भात पीक भरडण्यासाठी अथवा विक्री साठी राईस मिलवर शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. काही शेतकरी आपला भात हे विक्रीसाठी बाजारात आणत आहे. काही शेतकरी भात वान त्यामध्ये फुलेसमृध्दी, रत्नागिरी २४, कोलम व आंबेमोहोर ही घेत असत फुले समृद्धी , रत्नागिरी कोलम आंबेमोहोर त्याच बरोबरच सर्वाधिक पसंती असणाऱ्या इंद्रायणी तांदळाला यंदा दर्जानुसार किलोला ६० ते ७० रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे. मावळ तालुक्यात यंदा भाताच्या सरासरी उत्पादनात वाढ झाली आहे. मागील वर्षी सरासरी उत्पादन प्रतिहेक्टरी ४ हजार १८२ किलोग्रॅम होते. अंदाजे यंदा ते ७ हजार २८० किलोग्रॅम झाले आहे. यंदा बाजारात इंद्रायणी तांदूळ भाव खाण्याची शक्यता आहे. या तांदळाला दर्जानुसार सुमारे ६० ते ७०भात भरडणीसाठी राईस मिलवर लगबग मावळ तालुक्यात यंदा हेक्टरी उत्पादनात वाढ रुपयांपर्यंत किलोला भाव मिळण्याची शक्यता आहे. फुलेसमृध्दी वाणास ५० ते ५५ रुपये, रत्नागिरी २४ बाणास ४० ते ४५ रुपये, कोलम या वाणास ३५ ते ४० रुपये भाव मिळण्याची शक्यता आहे. मावळ भागाची खास ओळख असलेल्या आंबेमोहर वाणाचे उत्पादन कमी प्रमाणात घेतले जाते. या वाणाला ९० ते १०५ रुपये भाव मिळत आहे.तसेच इंद्रायणी तांदूळ यंदा तांदळाच्या दर्ज्यानुसार ६० ते ७० रुपये किलोने तांदळाची विक्री होण्याची शक्यता आहे. 

प्रतिक्रिया:- शेतकऱ्यांनी यांत्रिक पध्दतीने भात काढणीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भात लवकर मिलवर येत आहे. काही व्यापारी मिलवरच येऊन शेतकऱ्याकडून तांदळाची खरेदी करतात. तसेच मावळ तालुक्यात यंदा भात पिकाचे उत्पादन वाढले असून मावळ तालुक्यात पाऊस जास्त पडल्यामुळे तांदळाची मोड होत असल्यामुळे भाताचा रेट कमी होत असून पुढील दिवसात तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.असे श्रीराम राईस मिलचे मालक ज्ञानेश्वर कोंडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments