मावळ जनसंवाद :- मावळ तालुक्यात थर्टी फर्स्टला अद्याप पंधरा दिवस शिल्लक आहेत. मात्र, तरीही संबंधित व्यावसायिकांकडून त्याची तयारी सुरू झाली आहे, तर काही तरुणाईला आतापासूनच त्याचे वेध लागले आहेत. थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करण्यासाठी बेत आखू लागले आहेत. प्रत्येकाच्या ग्रुपवर आता गेल्यावर्षी कसा जल्लोष झाला. अन् यावर्षी थर्टी फर्स्ट कुठे अन् कसा साजरा करायचा? याचे नियोजन कसे करायचे? याचे विचारमंथन सुरू झाले आहे.डिसेंबर महिना मध्यावर आला की थर्टी फर्स्टची चाहूल तरुणाईला लागते. थर्टी फर्स्टला अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी असला, तरी तरुणाई उतावीळ झाल्याचे पाहायला मिळते. या उत्सवाला विधायक स्वरुप देण्याचा प्रयत्नही होत असतो. अंधश्रद्धा निर्मूलन व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या वतीने तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडूनही पाश्चिमात्य सणाचे अनुकरण होऊ नये तसेच नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या विधायक गोष्टींनी व्हावी, सामाजिक कार्यान व्हावी या हेतूने उपक्रम राबवले जातात. दि. ३१ डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजल्यापासून जल्लोषाला सुरुवात होते. दुचाकी, चारचाकी गाडीतून दंगेखोरांची टोळकीच्या पवना धरण, लोणावळा तसेच मावळ तालुक्यातील अंदर मावळ, पवन मावळ, नाणे मावळकडे रवाना होतात. तेथीलच लाकूडफाटा गोळा करून मांसाहारावर ताव मारला जातो. हे फॅड आता वाढले आहे. थर्टी फर्स्ट म्हटले की हुल्लडबाजी समीकरण होऊन बसले आहे काही बहाद्दर मोजताहेत दिवस... नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण केवळनिमित्त शोधत असतात. थर्टी फर्स्टच्या बहाण्याने मौजमस्ती करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे असे बहाद्दर केवळ दिवस मोजत बसलेले आहेत. हॉटेलमध्ये तर ३१ डिसेंबरच्या रात्री पाय ठेवायला जागा मिळत नाही. त्यामुळे अनेकजण निसर्ग सानिध्यात नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जातात. मात्र, तेथे धिंगाणा घातला जात असून पर्यावरणाचीही हानी केली जात असल्याने यावर्षी तरी त्यावर कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहे.थर्टी फर्स्टचे फॅड वर्षानुवर्षे वाढतच चालले आहे. जल्लोप अन् मौजमजेसाठीच निमित्त शोधणारी तरूणाई थर्टी फर्स्टच्या जल्लोपात हरवून जाऊ लागली आहे. विशेपतः पर्यटनस्थळावर त्याला उधाण येते.
0 Comments