Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळ शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवर भर शेणखताची कवडीमोल दराने विक्री....

मावळ जनसंवाद :- नाणे मावळ अथवा पूर्ण मावळ तालुक्यात जमिनीची सुपीकता धोक्यात आली असून आधुनिक तंत्रज्ञान, रासायनिक उपायांकडे वळत आहेत. रासायनिक खतांच्या झपाट्याने होणाऱ्या वापरामुळे उत्पादन वाढ होते. मात्र, यामुळे जमिनीच्या नैसर्गिक सुपीकतेला मोठा फटका बसत आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेणखतासारख्या नैसर्गिक खतांकडे दुर्लक्ष होत आहे. शेणखत कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली आहे. शेणखत तयार करण्यासाठी लागणारा वेळ, मेहनत, खर्च यामुळे शेतकरी त्याचा उपयोग करण्यास नाखूष आहेत. याउलट रासायनिक सेंद्रिय खताचेखतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीवर होणारे परिणाम गंभीर होत आहेत. सेंद्रिय घटकांची मात्रा कमी झाल्याने जमिनीची पोत खालावत आहे.सेंद्रिय खत तयार करणाऱ्या कंपन्या गावोगावी फिरून शेतकऱ्यांकडून कमी दरात शेणखत विकत घेतात. नंतर त्यात उसाची मळी, कडुनिंब पेंड, बोनमील आणि जीवाणू कल्चर मिसळून खत तयार करून विक्री होते. एका ४५ किलोच्या पॅकेटची किंमत ४५० ते ५०० रुपये आहे. यावरून शेणखताचे महत्त्व आणि किंमत समजू शकते.आरोग्यावर गंभीर परिणाम रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पिकांमधील रसायनांचे अंश थेट आपल्या शरीरात जात आहेत. परिणामी, तरुण वयात कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.काही शेतकरी शेणखत विक्रीतून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असले, तरी त्याला बाजारपेठेत योग्य दर मिळत नाही. रासायनिकखत सहज उपलब्ध होते आणि कमी कष्टांत पिकांचे अधिक उत्पादन मिळवून देते. या सोयीच्या पर्यायामुळे शेणखताचा वापर झपाट्याने कमी झाला आहे.

प्रतिक्रिया:- एक ट्रॉली शेणखत विकून चारशे-पाचशे रुपये मिळतात. स्वतःच्या शेतात टाकण्यासाठी काढणी, भरणी व वाहतूक खर्च येतो. स्वतःच्या शेतात टाकण्यापेक्षा शेणखत विकून चार पैसे मिळतात. अशी प्रतिक्रिया कांब्रे गावचे दुग्ध व्यवसायिक श्री.खंडू विश्वनाथ गायकवाड पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments