मावळ जनसंवाद :- मुंबई गोवा महामार्गालगत जोड़ला गेलेला उपरस्ता म्हणजे कामशेत -जांभवली रस्ता तसेच हा मार्ग अनेक गावांना जोड़ला गेला असून या मार्गावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र सध्या या मार्गावर बेसुमारपणे वाढलेल्या झाडाझुडपांमुळे हा मार्ग वाहनचालकांसाठी धोकादाय बनला आहे. कोणत्याही वळणावर एखाद्या वाहनांचा अपघात होण्याची भीती वाहनचालकांमधून व्यक्त केली जाते आहे. या मार्गावर गेली अनेक दिवसापासून मोठ मोठे जीव घेणे खड्डे पडले होते. मात्र या रस्त्यावर पडलेले खड्ड्यावर नव्याने पुढे खडी टाकून रस्ता जलदगतीने करण्यात आले. मात्र आजच्या घडीला टाकलेली खडी ही अपघाताला निमंत्रण भेटत आहे. तसेच मात्र अत्यंत अरुंद मार्ग असल्याने त्यात भयानक वळणे असल्याने त्यात काटेरी झुडपे खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असून यात हा मार्गच हरवला की काय असे चित्र निर्माण झाले त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून करावा लागतो प्रवास याला जबाबदार कोण ? तसेच कामशेत- जाभवली मार्गावर ही झुडपे अक्षरशः रहदारी करणार्या प्रवासी नागरिकांना धोकादायक ठरत आपघातास कारण ठरत असल्याचे बोलले जात आहे.
सदरच्या मार्गावर नाणे, कांब्रे,करंजगाव, गोवीत्री, वडवली,सोमवडी, थोरन, भाजगाव, उकसान अदी गावांचा समावेश होत आहे. कांबरे गावांसह अन्य अरुंद 'एस' आकाराची वळणे अरुंद व एकेरीमार्ग त्यात भयानक जागोजागी एस आकाराची वळणं आणि मोठं मोठी वाढलेली काटेरी झुडपे त्यातच पहाटेचा धुक्ला त्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षा, व टेम्पो चालकाला वाहन चालविताना पुढील व वळण अथवा प्रवासी हा या वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. या रस्ता अधिकची वर्दळ मार्गावरुन होणार आहे. त्यामुळे या काटेरी झुडपांची कोणी दखल घेईल का? असा संतप्त सवाल सर्वत्र व्यक्त केला जात आहे.आदिवासी वाड्या देखील यामध्ये समाविष्ट आहे. या भागातील नागरिक तसेच शाळा कॉलेजेस मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी त्याच बरोबर नजीकच्या तळेगाव, आंबी, नवलाख उंब्रे, उर्से येथील औद्योगिक क्षेत्रात बहुसंख्येने ये जा करत असलेले कामगार वर्ग सैदैव रहदारीच्या मार्गावरून रात्री अपरात्री प्रवास करित असतात. परंतु या मार्गावर पावसाळ्यात बेसुमारपणे वाढलेले काटेरी झुडपे अपघाताला कारणीभूत ठरु लागली आहेत. शाळा, कॉलेजेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तसेच पर्यटक देखील अधिक आहे. तसेच शेतकरी वर्गाची खरीप हंगामातील भात कापणी व झोडणी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे सुरू झाली त्यामुळे त्यांची लगबग बैल गाडीसह या मार्गावरून सुरू होणार आहे. मात्र अरुंद रस्त्यामुळे काटेरी वाढलेली झुडपे ही कोणाच्या ना कोणाच्या जीवावर वेतू शकतात आणि मोठा अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 Comments