मावळ जनसंवाद :- कामशेत - जांभवली रस्त्यावर जीवघेणे खड्डे अपघातांमुळे नागरिक त्रस्त खडतर रस्त्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. खड्डे हे नाणे मावलासाठी काही नवे नाही. कांब्रे-नाणे रस्त्यावर मध्यभागी अंतरावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. तसेच पाईप लाईनसाठी केलेले रस्त्यावर खोदकाम केले आहे. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे- मोठे अपघात झाले असून काहींना आपला जीवही गमावावा लागला आहे. त्यामुळे यावर उपाय योजना कराव्या अशी मागणी होत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने होत असल्याने वाहनांच्या रांगा लागत आहेत.तसेच इंद्रायणी पुलाच्या लगत मोठ-मोठे खड्डे पडले असून त्याची दुरुस्ती गरजेची आहे.गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांनी नागरिकांसह वाहन चालक त्रस्त झाले असून पाईप लाईनसाठी केलेले रस्त्यावर खोदकाम व खड्डे बुजवावे,अशी मागणी जोर धरु लागली आहे. नाणे मावळातील काही रस्त्यांची धूळधान उडवली.
प्र्शासनाच्या या ढिसाळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक रस्त्यांवर गुडघा भर खोल खड्डे पडले आहे पाईप लाईनसाठी केलेले रस्त्यावर खोदकाम व खड्डे या खड्यांनी किरकोळ अपघातमध्ये देखील वाढ होत असून प्रसंगी वादाचे प्रकार घडत आहे. काही ठिकाणी तर वाहनचालक वर अक्षरश: रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.अनेकांना अपघातालाही सामोरे जावे लागत आहे.या रस्त्यावर अनेक वेळा वाहनधारका मध्ये हमरी तुमरी तर कधी कधी किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासनाने तात्काळ ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले हे दुरुस्ती करावे अशी मागणी होत आहे.
0 Comments