मावळ जनसंवाद :- नाणे मावळ परिसरात गेल्या काही महीण्यापासून डासांचा उपद्रव वाढला आहे. तसेच नाणे मावळ व इतर वाड्या वस्त्यामध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. नाणे मावळातील एकमेव असलेली बाजारपेठ हि कामशेत या ठिकाणी आहे, शहरातील दवाखान्यांमध्ये रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. पावसामुळे अनेक भागांमध्ये चिखल, झाडे -झुडपे व दलदल होऊन पाणी साचले आहे. तसेच मोकळ्या व अडचणीच्या जागी वाढलेल्या गवतामुळे या भांगामध्ये डासांचा मोठा प्रादुभाव झाला आहे.त्यामुळे या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना डासाच्या उपद्रवाला सामोरे जावे लागत आहे. अगोदर पावसाचे दिवस असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अशातच डासांच्या उपद्रवामुळे त्यामध्ये भर पडली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नाणे मावळात दाट लोकवस्ती असल्याकारणाने या डासांच्या उपद्रवामुळे साथीचे आजार पसरत आहेत. डासांचा बदोबस्त करण्यासाठी संबधित प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना राबवून आरोग्य विभागाच्या सहकार्याने त्वरित औषध फवारणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकाकडून होत आहे.
प्रतिक्रिया - नाणे मावळ मधील शासकीय वैदयकीय अधिकारी मार्फत तसेच ग्रामपंचायती वतीने पावडर किवा औषध फवारणी तत्काळ करण्यात यावी अशी मागणी युवा उद्योजक सोपान खांडभोर यांनी व्यक्त केली.
0 Comments