मावळ जनसंवाद :- परस म्हणजे अंगण आणि या अंगणात फुलवलेली भाजीपाल्याची बाग म्हणजे परसबाग. पूर्वी घराशेजारी अथवा घराच्या बाजूला सांडपाण्याच्या पाण्यावर मोकळ्या जागेत घरगुती पाले भाज्या मोठ्या प्रमाणात पहावयास मिळायच्या त्यामध्ये अळू, कोंथबीर, कढीपत्ता, केळी, फणस, पेरू,लिंबू तसेच ऋतुमानामुळे काही शेतकरी बांधव पावसाळा - जून ते सप्टेंबर मध्ये पालक, कारली, मुळा , भोपळा, गाजर. तर हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रुवारी मध्ये गवार, भेंडी, मिरची, टोमॅटो, वांगी, वाल , भोपळा, चवळी,फुलकोबी. उन्हाळा - मार्च ते मे मध्ये वांगी, काकडी, फुलकोबी, दोडका तसेच औषधी, पुदिना, तुळस, गवतीचहा, कोरफड, वावडिंग फुलझाडे – मोगरा, जास्वंद, गुलाब, जाई, जुई, चमेली, काकडा, इत्यादी .इत्यादी रोजच्या जीवनात आवश्यक असणारे घरगुती सेंद्रिय खतावरील तयार होणारे पालेभाज्या , फुले मिळत होत्या. परंतु कालांतराने परडे (परस बाग) काही ठिकाणी आवर्जून पहावयास मिळत आहे. तर काही ठिकाणी परडे (परस बाग) ची जागा हि सिमेंटच्या घरांनी व अंगन यानी घेतली दिसून येत आहे. त्यामुळे परडे (परस बाग) नष्ट होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे.
परडे (परस बाग) ह्या पूर्वीच्या संकल्पने माणसांची आरोग्य चांगले राहील. ताज्या भाज्या मुळे शरीरास भरपूर जीवनसत्वे व खनिजे मिळतात. अशी होती परंतु सद्या सेंद्रिय खताची जागा हि रासायनिक खतानी घेतली आहे. त्यामुळे सर्व सामान्य व्यक्तीचे आरोग्य हे धोक्यात आले आहे. उदा. बीपी. डायबेटीस, शुगर, मूळव्याध, इत्यादी रोगांना सामोरे जावे लागत आहे. हि वस्तू स्थिती आहे. भविष्यात जुने ते सोन हि संकल्पना आहारात आली तर सामान्य व्यक्तीचे आरोग्य हि तंदुरुस्त राहील. परडे (परस बाग) वाचवणे हि काळाची गरज आहे.
प्रतिक्रिया - शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, परंतु आज ग्रामीण भागामध्ये शहरी भागांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. याकरिता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये परडे (परस बाग) विषयी जागृती करायला हवी. तसेच घराशेजारील मोकळ्या जागेत घरगुती पद्धतीने भाजीपाला निर्माण केला पहिजे हि सुरवात प्रथम स्वतःपासून केली पाहिजे अशी माहिती युवा उद्योजक निखिल पिंगळे यांनी दिली.
0 Comments