मावळ जनसंवाद :- गौरी-गणपतीच्या प्रसाद, नैवेद्याला महागाईची झळ मोठ्या प्रमाणात बसत असून त्या मध्ये डाळ, गूळ, गहू, तेल दरात वाढ; यंदा स्वयंपाकघरातील बजेट वाढत असल्यामुळे महिलावर्गा नाराज झाल्या आहेत....गौराईच्या मुखवट्यांचीही खरेदी झाली...सजावट साहित्यही मनासारखे मिळाले...आता महिलावर्गान गौरी-गणपतीसाठी लागणाऱ्या नैवेद्य व प्रसादाच्या साहित्य खरेदीकडे पावले वळवली आहेत; पण नैवेद्याच्या पानातील पदार्थ बनवताना यंदा महिलांचे स्वयंपाकघरातील बजेट वाढत आहे. डाळ, तेल, गूळ, नारळ या साहित्याचे दर वाढल्याने यंदा गौरी- गणपतीच्या नैवेद्याला महागाईची झळ बसत आहे.
लाडक्या गणरायाचे स्वागत खपली गव्हाची खीर आणि उकडीचे किंवा तळणीच्या मोदकांनी केले जाते. यंदा खपली गव्हाचे दर १२० रुपये प्रतिकिलो आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हामध्ये ३० रुपयांची वाढ झाली आहे. गूळही गुळाचे दरही वाढले आहेत.सेंद्रिय गुळाची किंमतही गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ रुपयांनी वाढली आहे. तेल प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी वाढले आहे. यंदा किलोमागे ते २० रुपयांनी वाढला आहे.काजू दरात किलोमागे १०० रुपयांची वाढ झाली असून, खारीक, जर्दाळू यांच्या किमतीही प्रतिकिलो शंभर रुपयांनी वाढल्या आहेत. नारळ २० रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत आहेत, तर सुके खोबरे वाटी २०० रुपये किलो झाली आहे.हरतालिका उपासाला वरई तांदूळ १२० किलो आहे. दहा पुरणपोळीचे बजेट वाढले.
गौरी पूजनादिवशी गौरीला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. या वर्षी हरभराडाळीचे दर किलोमागे सव्वाशे रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे पुरणपोळीच्या बजेटचाही आकडा यंदा वाढत आहे. बाप्पांसह गौरीच्या नैवेद्याचा धाट यथोचित व्हावा यासाठी घराघरांत गृहिणींच्या पाककौशल्यासोबतच हातातील पैशांच्या नियोजनाचाही कस लागत आहे.परिणामी, बाप्पांना आवडणारी खपली गव्हाची खीर व मोदक बनवण्यासाठी या वर्षी गृहिणींना घरखर्चात जादा रक्कम भार पडत आहे.
0 Comments