Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे मावळात विजेचा लपंडाव....

मावळ जनसंवाद :- नाणे मावळात मोठ्या प्रमाणात दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडीत होत आहे. नाणे मावळात व मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी  हा सण साजरा केला जातो. सनासुदी मध्ये आठ दिवसापासून रात्र दिवस नाणे मावळ विजेचा लपंडाव सुरुच आहे. मावळ तालुक्यात गणेश चतुर्थी  ह्या सणा निमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना  एन सनासुदीमध्ये  विधूत पुरवठा खंडित होत आहे. ह्या कडे ना प्रशासन ना महावितरणचे अधिकारी लक्ष्य देण्यास तयार नाही हि वस्तू स्थिती आहे. काही ठिकाणी विधूत तारा ह्या लोमकळत पडलेल्या अवश्थेत आहे.तसेच कोंडीवडे ना.मा ते करंजगाव ला जाणारी विधूत लाईन बरेच दिवसांपासून अखेरचा श्वास मोजत आहे. परंतु करंजगाव येथून पुढे गावांना जोडणारी लाईट ही करंजगाव पर्यंत बंद करून ठेवण्यात असताना महावितरण ह्या कडे लक्ष देण्यास तयार नाही.
           विधूत समस्या संदर्भात वारंवार सांगूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. अशी तक्रार नाणे मावळतील गावातील ग्रामस्थ करीत आहे.तसेच  वारंवार होत असलेला विद्युत पुरवठा सनासुदीमध्ये सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.

Post a Comment

0 Comments