मावळ जनसंवाद :- नाणे मावळात व ग्रामीण भागात पूर्वीच्या काळी सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणाऱ्या वस्तू कंदिल, दिवा, स्टोव्ह व बत्ती ही साधने आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांची जागा विजेवरील उपकरणांनी घेतली आहे.दैनंदिन उपयोगात इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढला आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी विद्युत साधनांची निर्मिती व वापर अत्यल्प होता. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिक परंपरागत वस्तूंचा उजेडासाठी वापर करायचे. ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या घरात रॉकेलचा दिवा, स्टोव्ह व कंदिलाचा वापर होत होता.आजही ग्रामीण भागात वाड्या वस्त्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.
स्वयंपाकासाठी स्टोव्ह, तर उजेडासाठी घरोघरी रॉकेलच्या चिमण्या, कंदील, बत्ती वापरल्या जात होत्या. दिवसा घरातील दिव्यामध्ये रॉकेल भरून वात लावून ठेवायचे. संध्याकाळ झाली की प्रत्येकाच्या घरी दिवा प्रकाशमान केला जायचा. काही घरी लोखंडी पत्र्यापासून बनविलेले तर काही घरी पितळी धातूचे दिवे होते. काही ठिकाणी दगडाचे दिवे आहे.रात्री झोपताना दिवा बंद करून झोपण्याची सवय प्रचलीत होती. कंदिलाचा वापर शेतकरी शेतात जाताना करायचे. रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देताना सुद्धा शेतकरी कंदील वापरत असत.
पूर्वी घरामध्ये एखादा कार्यक्रम असला अथवा सणासुदीला रॉकेलच्या बत्ती वापरत असत. रॅकेलच्या बत्तीला मोठी बात पेटवून मोठा प्रकाश मिळायचा. लग्नाच्या वराती किंवा अन्य मिरवणुकीत माणसांच्या खांद्यावर ठेवून बत्तीचा वापर केला जात असे. त्यावेळी सेलवर चालणाऱ्या बॅटरी सुद्धा होत्या परंतु त्यांचा खर्च परवडणारा नव्हता. शिवाय बॅटरी वापरायला मर्यादा यायच्या. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा कल रॉकेलवर चालणाऱ्या साधनांवर होता. सध्या रेशन कार्डवर रॉकेल देणे बंद झाले आहे. रॉकेल उपलब्ध होत नसल्याने व नवनवीन विद्युत उपकरणे बाजारात आल्याने जुन्या वस्तुदेखील मागे पडल्या आहेत.स्टोव्हची जागा गॅस शेगडीने घेतली आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरी, इनव्हर्टर सारखी उपकरणे उपलब्ध झाली आहेत. वरातीसाठी जनरेटरचा वापर केला जात आहे. चायनीज इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने रॉकेलवर चालणाऱ्या कंदिल, दिवा व बत्ती अडगळीत गेल्या आहेत हीच वस्तूस्थिती आहे. रात्रीच्या अंधारात रॉकेलवर चालणाऱ्या बत्तीला मोठे महत्त्व होते ज्याच्याजवळ ही रॉकेलवरील बत्ती असेल त्याच्याजवळ कार्यक्रमासाठी बत्तीची मागणी होत असे.
पूर्वीच्या जुन्या वस्तू कंदील, दिवा, स्टोव्ह व बत्ती ही साधने संवर्धन करून जोपासणे ही काळाची गरज आहे. तसेच पुढच्या पिढीला या वस्तू माहित व्हावा या दृष्टीने या वस्तूची जनजागृती करावी अशी माहिती युवा उद्योजक अविनाश उत्तम गायकवाड यांनी दिली.

0 Comments