Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कांब्रे ना.मा. ते करंजगाव मार्गावरील साकव पूल बनलाय धोकादायक....

मावळ जनसंवाद :-आणखीन किती पावसाळे वाट पाहायची?पुलाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची 

 मागणी ....

              नाणे मावळ विभागातील कांब्रे ना.मा. आणि करंजगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या साकव पुलाची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. दरवर्षी पावसात हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे दळणवळण ठप्प होते. तसेच साकव पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे तुटले असून वाहन चालकांना अत्यंत सावधपणे येथून प्रवास करावा लागतो. हे जीव मुठीत घेऊन प्रवास करणे कधी बंद होणार, असा सवाल स्थानिक करत आहेत. मुख्य मार्गावर अतिशय छोटा असा हा पूल आहे. जोरदार पावसानंतर डोंगर दऱ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे ओढ्याला पूर येतो आणि साकल पूल पाण्याखाली जाऊन दळणवळण ठप्प होते. 


अनेक गावांचा संपर्क तुटतो. हा ओढा पुढे जाऊन कुंडलिका नदीला मिळतो, त्यामुळे पूल अतिशय महत्वाचा आहे. सध्या असलेला साकव पूल पूर्णतः मोडकळीस आला असून संरक्षण कठडे तुटले आहेत. एखाद्या जोरदार पावसात पूलच वाहून जाईल की काय, अशी भीती गावकऱ्यांना आहे. पूल    कोसळून मोठी दुर्घटना होण्यापूर्वी पुलाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा आणि स्थानिक ग्रामस्थ, वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक प्रशासनाकडे करीत आहेत.



           पूल पाण्याखाली गेल्यास १७ गावांचा संपर्क तुटतो -  जोरदार पावसामुळे यंदाही साकव पुलावरून पाणी वाहत होते. पूल पाण्याखाली गेल्याने ज्या गावांचा संपर्क तुटतो, त्यामध्ये गोवित्री, साबळेवाडी, करंजगाव, ब्राह्मणवाडी, मोरमारेवाडी, पाले नामा, उकसान, वडवली, वळवंती, कोळवाडी, भाजगाव, सोमवडी, शिरदे, राकसवाडी, थोरण, जांबवली, उंबरवाडी अशा साधारण १७ गावांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत कामगार वर्ग, दुग्ध व्यवसायिक, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक वर्ग, पर्यटक सर्वांनाच नाहक त्रास सहन करावा लागतो.


      


Post a Comment

0 Comments