मावळ जनसंवाद : मावळ तालुक्यातील लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा वापर करीत असल्याने मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो. भात उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. मावळ तालुक्यात ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा प्रथम क्रमांक लागतो. पुणे विभागाच्या मावळ तालुक्यातील सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक असून साळ, इंद्रायनी, चिमण साळ,आंबेमोहर, सोनम इत्यादी जातीचे भात लागवड केली जाते
नाणे मावळातील शेतकरी हे हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय
व रासायनिक खतांच्या मात्रांचा संतुलित वापर, मशागतीचे व लावणीचे योग्य तंत्रज्ञान, पीक संरक्षण उपायांचा अवलंब पहावयास मिळत
आहे.
मावळ तालुक्यात पुरेशा पावसाअभावी
तालुक्याच्या विविध भागात मजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे. एकूण
क्षेत्राच्या सुमारे ४० ते ५० टक्के क्षेत्रामध्ये भात लागवड
झाली आहे.काही ठिकाणी भातरोपे लागवड करण्यासाठी माणसे मजुर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज
आहे. तसेच काही ठिकाणी भात रोपे लागवडी साठी पाणी नसल्यामुळे लागवड रखडली आहे.मावळ तालुक्यात सर्वत्र
भातलागवड करण्यासाठी मजुरांची कमरता असल्याने मजुरानि मंजुरीत वाढ केली आहे. मात्र
शेतक-या पुढे पर्यायी व्यवष्ठा नसल्याने मागील तशी मजुरी शेतकरी बांधव मजुरांना
देऊ लागले आहेत. महिला मजुरांना तीनशे ते
साडेतीनशे रुपये रोख व पुरुष मजुरांना चारशे ते साडे चारशे रोख दिले जात आहे. तसेच
शेतामध्ये चिखल करण्यासाठी बैल जोडीला एक हजार ते पंधराशे रुपये दिले जातात. ते
ट्रैक्टर प्रत्येकी १ तासासाठी २००० ते २५०० रुपये दिले जात आहे. एकीकडे भात लागवडीला
उत्पादनापेक्षा खर्चच जास्त असला तरी रोजच्या जीवनात भाताची आवश्यकता असल्याने
रासायनिक युक्त खत भाताला न वापरता सेंद्रिय खताला प्रधान्य देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
0 Comments