Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कामशेत- जांभवली रस्त्यावर जागोजागी खड्डे अन खचलेले रस्ते !

  मावळ जनसंवाद :  दुरुस्तीकडे दुर्लक्ष : अपघातांना निमंत्रण अन वाहने खूळखली ....  

      मावळ तालुक्यातील नाणे मावळातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवष्ठा झाली आहे. कामशेत- जांभवली मार्ग अंत्यत खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, नाणे गावातील शेजारील येथे रस्ता मधोमध अपूर्ण अवस्थेत ठेवला असून, त्या ठिकाणी  अपूर्ण अवस्थेत ठेवलेल्या रस्ता व रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. 

        नाणे मावळातील नाणे हे एकमेव ठिकाण असल्याने या- ना त्या कामानिमित्त दररोज ग्रामष्ठ व नाणे मावळात येणारे पर्यटन ये- जा करीत असतात. नाणे मावळातील  परिसरातुन नोकरी व व्यवसा या निमित्त मावळ तालुक्यात अथवा  तालुक्यातील विविध ठिकाणी जाणाऱ्या  प्रवासाची संख्या लक्षणीय आहे. मात्र  रस्ता खराब झाला असल्याने त्यांना अनंत  अडचणीचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे. ठीकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडली असून, जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत. तसेच नाणे मावळातील येथील विद्यार्थी  शिक्षणासाठी  दररोज जात असतात. त्यांनाही रस्ता खराब असल्याने रस्त्याच्या जाचातून जावे लागते. सध्या उन्हाळी सुट्टी असून, सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी अनेकांनी विविध ठिकाणी ये -जा करतात. मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेकदा दुचाकी घसरून अपघात घडत आहेत. 


          याच मार्गावर नाणे गावात लगत अपूर्ण अवस्थेत ठिवलेले आहे. हा रस्त्याचा  भाग दोन्ही बाजूने उंचवटा असल्यामुळे  ह्या  रस्त्याच्या मध्यभागी खड्डा तयार झाला आहे. ह्याच खड्ड्यात वाहने आढळून अपघात घडत आहेत. तर वाहनाचे हि मोठे नुकसान होत असून, वाहन खुळखुळी झाली आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्याने जाताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वेगाने येणारी वाहने येथे आदळून वाहनावरील चालकाचा ताबा सुटून अपघात घडत आहेत.       
          कामशेत- जांभवली रस्त्यावर जागोजागी  खड्डे पडले आहेत, तर पाईप लाईन साठी  रस्ता खोदला आहे. तर साईट पठ्या  खचल्या असून, वाहने एकमेकांसमोर  येऊन वादावादीचे प्रसंग घडत आहेत. साईडपट्या खचल्याने दुचाकी घसरून लहान मोठे अपघात घडत आहेत. रस्ता दूरष्टीची मागणी वारंवार केली जात असून प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments