मावळ जनसंवाद : नाणे मावळची जीवनदायिनी असलेली इंद्रायणी नदीचा सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये समावेश होऊनही इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याची आश्वासने आणि घोषणा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतात मात्र त्याची अंलबजावली होत नाही.त्यामुळे इंद्रायणी नदीचा श्वास जलपर्णीमुळे गुदमरत आहे. नाणे मावळचा प्रवेशद्वारावर कामशेत- नाणे पुलाजवळ इंद्रायणी नदी मध्ये वाढलेल्या जलपर्णीमुळे हि नदी आहे. कि खेळाचे मैदान असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे. हि इंद्रायणी नदी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे.
तसेच इंद्रायणी नदी मध्ये दूषित पाने सोडलेली जात असल्यामुळे नदीचे पाणी काळपट झाले आहे. हि वस्तूस्थिती आहे.
इंद्रायणी नदी प्रदूषमुक्त करण्यासाठी गेल्या वर्षात पावले उचलली गेली, मात्र या पावलांना गती मिळाली नाही. नदीतील दूषित पाण्याचा फटका नदीकाठच्या नागरिकांना व दुभत्या जनावरांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी दूषित करणाऱ्या सरकारी संस्था यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया:- माणसे अनेक ठिकाणी अतिक्रमण करतात पण आता निसर्गाने निसर्गावर अतिक्रमण चालू केले ह्या अतिक्र्मामुळे शेतक-याला अनेक संकटाना सामोरे जावे लागते. जलपर्णीच्या अतिक्र्मामु ळे नदीचे सौंदर्य धोक्यात आले आहे अशी माहिती प्रगतशील शेतकरी नवनाथ नाणेकर यांनी माहिती दिली.
प्रतिक्रिया:- नदीत जलपर्णीची वाढ झाल्यामुळे नदीत वाहून येणारा कचरा अडकला जातोय त्यामुळे पाण्यातील जलचर यांचे जीवन धोक्यात आले आहे अशी माहिती शेतकरी किशोर खोंडे यांनी माहिती दिली.
0 Comments