मावळ जनसंवाद : नाणे मावळ व तालुका मध्ये सर्वत्र ठिकाणी शनिवार पासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांना जरी या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी शेतकरी मात्र अक्षरशः देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. बाजरी, ज्वारी, आंबा, कलिंगड, गहू, कांदा, अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यात शनिवारपासून वादळी पावसासह गारपीट झाली आहे. मावळ तालुल्यात मागील तीन-चार वर्षात दुष्काळाचं सावट काहीसे कमी झालंय आहे. पण अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे. खरं तरं हा काळ रब्बीचे पीक घेण्याचा होता. मात्र फळपिकांचे झालेलं नुकसानीने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. सलग दोन दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, पिकांना फटका बसला आहे. आंब्यातही पावसामुळे जंतू तयार होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. तसेच जील्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने नाणे मावळातील आंबा बागायतदार चिंतातुर झाले आहेत.
एकीकडे काकडीला दर नाही आणि दुसरीकडे बेदाण करणाऱ्या टाकलेल्या शेतकऱ्यांवर या अस्मानी संकटामुळे आणखीन संकट वाढले आहे. दुसरीकडे महावितरण कडून वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांने लाईट बिल कसे भरावे असा प्रश्न उपस्थित करत आता प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन ठोस मदत द्यावी अशी मागणी नाणे मावळतील शेतकरी करीत आहे.
नाणे मावळत चक्रीवादळ आल्याने अनेक घरावरील छप्पर उडाल्याने घरातील साहित्यांच नुकसान झाले, या अवकाळी पावसामुळे मात्र काही प्रमाणात असलेला गहू, बाजरी, काकडी, कांदा, भाजीपालासह इतर पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने कहर केला आहे. जिल्ह्यात व मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली तर मावळ तालुक्यात गारपीट वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तर रात्री सुद्धा मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
नाणे मावळात व येथील परिसरात गारपीट झाल्याने फळ पिकांचे आणि कांदा पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत. पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे.
0 Comments