Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

 मावळ जनसंवाद :-नाणे मावळ परिसरात बाजरीचे पीक जोमात  आले आहे. बागायती पट्टा असलेल्या या परिसरात ज्वारी, बाजरी व गव्हाचे क्षेत्र अत्यल्प असते.चालू वर्षी या परिसरात खरीप हंगामात बाजरीची लागवड झाली होती. हंगामी पिकांना शेतकऱ्यांना अपेक्षित उतारा मिळाला नाही. मात्र बाजरीचे पीक जोमदार आले आहे. मागास  हंगामातील बाजरीची वाढ चांगली झाली असून, टपोरे दाण्यांनी कणसे लगडली आहेत.परिणामी, या वर्षी बाजरीचा उतारा चांगला मिळण्याची शक्यता आहे. मात्र पक्ष्यांचे थवेचे थवे बाजरी पिकावर अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकाची राखण करता करता दमछाक होत आहे. शेतकऱ्यांनी पक्षापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकाच्या बाजूने साड्यांच्या कातड्या बांधल्याचे दिसत आहे. तसेच गोफण घेऊन शेतकरी सकाळ संध्याकाळी पिकांची राखण करीत आहे.  

      कोंडीवडे  ना.मा  परिसरात प्रगतशील शेतकरी हनुमंत चोपडे  यांच्या शेतामध्ये बाजरी हि दाण्यावर आली असताना टिपलेले फोटो.  

Post a Comment

0 Comments