मावळ जनसंवाद :- नाणे मावळात मोठ्या प्रमाणात वाकलेल्या खांब, तुटलेल्या तारा,रोहित्राच्या प्यूजपेटयाची झालेली दुरवस्था,लोंबकळलेल्या तारा नाणे मावळात मोठ्या प्रमाणात पाहावहास मिळत आहे. नाणे मावळात गावा गावा मध्ये अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे विजेचा लपंडाव होत आहे. या नादुरुस्त उपकरणांच्या दुरुस्तीकडे महावितरणने दुर्लक्ष केले आहे.
मावळ तालुक्याच्या नाणे मावळ मध्ये महावितरणच्या अनेक उपकरणांची दुरवस्था झाली आहे. नाणे मावळात महावितरण मुळे अपघात झाले आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणे महावितरणने थांबवावे. तसेच या नादुरुस्त उपकरणांची दुरुस्ती करण्याची मागणी नाणे मावळातील ग्रामष्ठ करीत आहे. नाणे मावळ परिसरात महावितरणच्या रोहित्र,डीपी प्यूजपेटया जीर्ण झाल्या आहे. त्यातून तारा लोंबकळत आहेत. या तारा एकमेकांना चिटकून वीज जाते. यामुळे घरातील अनेक उपकरणेही खराब होत आहेत. याबाबत तक्रारी करूनही कुठलीच कारवाई केली जात नाही. पुंडलीका व इंद्रायणी नदी काठावरील शेतकऱ्यांच्या मोटारीसाठी असलेल्या रोहीत्रहि नादुरुस्त झाले आहे.
0 Comments