Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

मावळ जनसंवाद :डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ जयंती औचित्त साधून गोल्डन ग्लेडस मा.विद्यालय करंजगाव येथे इयत्ता दहावीचा बच २००५ मधील विद्यार्थी स्नेहमेळावा पार पडला.     

       जगामध्ये  स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे.अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे  असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. असा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज व विद्येची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.  
       कित्ती वर्षांनी भेटतोय.....कसे आहेत सगळे......अशा अपुलकीच्या प्रश्र्नांपर्यंतचे संवाद आणि महाविद्यालयीन जीवनातील मर्मबंधातील आठवणींना उजाळा देण्यापासून गरजू विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, अशी सामाजिक जाणीव समृध्द करणाऱ्या चर्चा येथील  गोल्डन ग्लेडस मा.विद्यालय करंजगावच्या प्रांगणात रंगल्या. निमित्त होते महाविद्यालयाच्या गेल्या एकोणीस वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांसाठीच्या स्नेमेळाव्याचे. महाविद्यालयाने घडवलेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याच्या निमित्ताने येथील माजी विद्यार्थी व  महाविद्यालयाच्या सहकार्याने स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते.         
         गोल्डन ग्लेडस मा.विद्यालयचे मुख्याध्यापक बापूराव नवले सर, शंकर रा धावणे (महाराष्ट्र राज्य  शाळा कृती समिती मावळ)
दत्तात्रय महाजन सर, सुलभ राळे सर, अनिल सातकर सर, अशोक वाडेकर सर, गालफाडे सर, केदारी सर,उत्तम गावडे, देवरे अन्य मान्यवर व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
       महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी योगेश माझिरे, संदेश खोंडे, अर्जुन टाकवे, अमोल शेवाळे, राहुल मोहिते, गोपीनाथ गायकवाड, योगेश गायकवाड, उमेश तंबोरे, अतुल चोपडे पाटील, नागेश फोटफोडे, अनिल फोटफोडे, नरेश मोढवे, सचिन गायकवाड, वर्षाराणी मावकर, सुलोचना मालुसरे, वैशाली पिंपळे, सारिका शेठे,आदी यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयात शिक्षण घेतलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्रीत आल्या होत्या.अनेक वर्षांनी झालेल्या गाठीभेटीने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जुन्या आठवणींच्या चर्चा, गप्पा, खोड्या, किस्से व हास्य कल्लोळाने हा मेळावा उत्तरोत्तर रंगला होता. आपल्या जुन्या शिक्षक, मित्र-मैत्रिणीची भेट झाल्याने एक वेगळा आनंद सारेच जण अनुभवत होते. अनेक जन ऋणानुबंध जपत भूतकाळात रमले होते. आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आठवणी ताज्या केल्या. 

१९९५ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. मेळाव्यात अनेक माजी विद्यार्थ्यांनी गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत केली आहेत. यावेळी उच्चतम कामगिरी करणाऱ्या माजी विध्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी विद्यार्थी योगेश माझिरे यांनी केले, महाविद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शंकर रा धावणे (महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती मावळ) यांनी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी ऋणानुबंध प्रस्थापित करण्याचे अवाहन केले.

Post a Comment

0 Comments