Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

धडे गिरवण्याची लहान वयात मुलांच्या हातात बैलाचा कासरा....

मावळ जनसंवाद :मावळ तालुक्यात घरटी बैल जोडी मोठ्या प्रमाणात पाळली जाते. काही शेतकरी बांधब बैलाचा वापर हा शेती साठी व  शर्यती साठी वापर केला जातो. मावळ तालुक्यात व महाराष्ट्र  शर्यत हा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. शिवाय पुणे जिल्हातील सर्वात प्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत. शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास ४०० वर्षाची जुनी परंपरा आहे असे सांगितले जाते. बैलगाडा शर्यत आणि महाराष्ट्र, बैल आणि शेतकरी हे नाते पूर्वापार चालत आलेले असून, शेतीत ट्रॅक्टरच्या आगमनाने आधीच हद्दपार झालेला बैल हा फक्त बैलगाडा शर्यतीमुळे बैल हा शेतकऱ्यांकडे टिकून आहे.  

         पुणे जिल्यातील काही भागात हा खेळ वार्षिक यात्रांना मोठ्या आनंदाने खेळला जातो. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात यात्रा निमित्त अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी व बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात लहान- मोठे वयरूढ व्यक्ती  जात आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण हे या खिल्लार बैलांच्या शर्यतींवरती खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. 
          ज्या वयात शिक्षणाचे धडे गिरवण्याची असते त्या वयात मुलांच्या हातात बैलाचा कासरा असल्यामुळे पुढची पिढी हि अशिक्षित राहण्याची शक्यता आहे. ज्या वयात लेखकांची नावे पाठ करायची त्या वयात बैलगाडा मालक व त्यांच्या बैलाच्या नावासकत त्यांची नावे तोंडपाठ, ज्या वेळी कविता पाठ करायच्या  त्या वयात बैलगाडा मालकांची घोषणा बाजी न चुकता अर.....र .र. र. तुमच्या आमच्या परिचयाची  नामकीत गाडी चे मालक ------- फायनल सम्राट, उद्योजकाची बारी ----- एका सरपंचाची बारी  ----- एका पाटलाची बारी---- एका चेअरमन बारी------ अशा घोषणा दिल्या जातात. 

Post a Comment

0 Comments