मावळ जनसंवाद :- नाणे मावळातील शेतकरी हनुमंत चोपडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यातील जेमतेम १० गुंठा मध्ये या अल्प शेतीत काकडी हे पिक केले आहे. गेल्या काहीवर्षापासून ऊस व बाजरी आणि काकडी पिकात सातत्य ठेवत उत्तम नियोजनातून आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. अल्प शेतीमध्ये पिकांच्या योग्य नियोजनातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करतात. कमीत कमी पाण्यामध्ये चांगली पिके घेण्याकडे त्यांचा कल आहे. सध्या रब्बीमध्ये त्यांच्याकडे १० गुंठे काकडी आहेत. शिक्षण जेमतेम असले, तरी गेल्या १५-२० वर्षांपासून शेती करत असल्याने अनुभव चांगला आहे. दरवर्षी ऊस व बाजरी आणि काकडी पिकांमध्ये सातत्य ठेवले असून, उत्तम उत्पादना सोबतच बाजाराच्या अभ्यासामुळे उत्पन्नही हमखास मिळवतात.
कोंडीवडे ना.मा परिसरात काकडी पिक जोमात आले असताना टिपलेले फोटो.
0 Comments