Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

कामशेत - जांभवली रस्ता बनला अपघाटाचा अड्डा...!

 मावळ जनसंवाद :-  मावळ तालुका हा निसर्ग सृष्टी व नैसर्गिक संसाधन सामग्री बहरला असून, मावळातील निसर्ग  सृष्टी पाहण्यासाठी अनेक  पर्यटक मावळात भेट देत आहेत.नाणे मावळात जाण्यासाठी  कामशेत - जांभवली  हा मुख्य रस्ता असून  हा  रस्ता  बनला जीवघेणा असून  ह्याच रस्त्यावर  लहान मोठ अपघात होत आहे. ह्याच रस्त्यावर ठीक ठिकाणी वळण आहे तसेच नको तेथे गतिरोधक आहे. शिवाय  रस्त्याच्या  दोन्ही बाजूला असलेल्या साईडपठ्या  ह्या पूर्णपणे खचून गेल्या आहे  शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या काटेरी झाडे झुडपेचे अतिक्रमण मुळे अनेकदा हया रस्त्यावर अपघात झाले आहे. 
              नाणे मावळातील  कामशेत - जांभवली हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर ठिकठिकाणी  पडलेल्या खड्ड्यांमुळे चालकांना जिव मुठीत वाहन चालवावे लागत आहे. शिवाय  रस्त्याच्या  दोन्ही  बाजूला   झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणत वाढलेली आहे. ती तात्काळ तोडण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. या रस्त्यावर सतत वर्दळ असते. त्या मध्ये कामगार वर्ग, विद्यार्थी, महिला वर्ग, या रस्त्याने ये करतात. रस्ता ठीकठाक करण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार स्थानीक नागरिक आणि विद्यार्थी करीत आहेत.  
             प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे येथील नागरिकांना रस्ताविना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न नाणे मावळातील नागरिकांना पडला आहे. नाणे मावळात जाण्यासाठी  कामशेत - जांभवली  हा  मुख्य  एकच रस्ता आहे. मात्र त्याची दयनीय अवस्था आहे. या रस्यावर देखील अनंत खड्डे आहेत, तर मागील काही दिवसात ठीकठिकाणी डागडुजी करण्यात आली आहे. त्यामुळे कामशेत  रेल्वे गेट - जांभवली ह्या रस्त्याची नाणे मावळातील नागरिकांच्या नशिबी चांगल्या रस्ताची प्रतीक्षा संपता संपत नाही.    
         नाणे मावळातील शेकडो रहिवासी याच रस्त्याचा  वापर करीत आहे. प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने अनेकदा  ह्याच  रस्त्यावर आतापर्यंत अनेक  लहान -मोठे अपघात झाले आहे. याला जबाबदार कोण मागील काही वर्षांपासून या रस्ताची  फक्त डागदुजी केली जात आहे. मात्र योग्य प्रकारे रस्ता रुंदीकरण केले जात नाही.                                                                                               








Post a Comment

0 Comments