मावळ जनसंवाद :- नाणे मावळ हा निसर्गाने नटलेला परिसर असून ह्या ठिकाणी अनेक गावे असून ह्या गावांना अन्य साधारण महत्त्व आहे. त्या मधील कोंडीवडे ना.मा या रस्त्याचे मागिल चार वर्षापूर्वी नवीन रस्त्याचे काम करण्यात आले परंतु कांब्रे-कोंडीवडे ना.मा ह्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईटपठ्ठावर मुरूम न टाकल्यामुळे अपघाताला निमंत्रण होत आहे. दोन्ही बाजूला साईटपठ्ठावर मुरूम न टाकल्यामुळे एका वेळेस एकच गाडी पास होत आहे. शिवाय साईट पठ्ठा रस्त्यापासून साधारण १ ते २ फुट खचलेला आहे. तसेच रस्ता बनवताना साईट पट्टा वर कोणत्याच प्रकारचे मुरूम टाकण्यात आले नाही.
कांब्रे-कोंडीवडे ना.मा या रस्त्याच्या काही भाग हा अर्धवट अवस्थेत ठेवलेला आहे. हि वस्तू स्थिती आहे. खड्यामुळे चालकांना जिव मुठीत वाहन चालवावे लागत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणत वाढलेली आहे. ती तात्काळ तोडण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे. या रस्त्यावर सतत वर्दळ असते. त्या मध्ये कामगार वर्ग, विद्यार्थी, महिला वर्ग, या रस्त्याने ये करतात. रस्ता ठीकठाक करण्यासाठी वारंवार मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार स्थानीक नागरिक आणि विद्यार्थी करीत आहेत.
तसेच कोंडीवडे ना.मा रस्त्याच्या त्या संदर्भात प्रशासनाला यां ना लेखी स्वरूपाची निवेदने/ अर्ज देऊन सुद्धा लक्ष देयाला तयार नाही असा आरोप ग्रामष्ट करीत आहे.
प्रशासनाने कांब्रे-कोंडीवडे ना.मा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या साईटपठठ्या वर मुरूम टाकण्यात यावा. तसेच अपूर्ण रस्त्याचे काम पुर्ण करावे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणत वाढलेली आहे. ती तात्काळ तोडण्यात यावे.
0 Comments