Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

शेतीसाठीची लाकडी अवजारे कालबाह्य होताहेत !

मावळ जनसंवाद :- मावळ तालुका हा शेतकरी शेती हि मोठ्या प्रमाणात केली जाते. मावळ तालुक्यात नाणे मावळ, अंदर मावळ व पवन मावळ या तिन्ही भागातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरल्याने शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडी अवजारांचा वापर आता कालबाह्य होत आहे. सध्या लोखंडी अवजारांना शेतकऱ्यांची पसंती आहे. त्यामुळे सपूर्ण मावळ तालुक्यात व ग्रामीण भागात लाकडी काम करणाऱ्या सुतारांवर उपासमारीची वेळ आली आहे.सध्या ग्रामीण भागात शेतकरी शेतीची कामे करण्यात व्यस्त आहेत.बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतातील भात पेरणीसाठी उखळणीची कामे करीत आहेत.कार्तिक महिन्यात मावळ तालुक्यातील शेतकरी खरीप पेरणीच्या कामात आहेत.शेतात एक तासाचे नांगरणीसाठी छोटे ट्रॅक्टरचे १००० मोठे ट्रॅक्टरसाठी १८०० रुपये खर्च येत आहे. मागील काही वर्षांपासून लाकडी नांगर, कुळव, पाभर, मैंग आदि वस्तू बैलगाडीसह इतर शेती उपयोगी अवजारे कालबाह्य झाली आहेत. 

                 

नव नवीन यंत्रामुळे पारंपरिक पद्धतीने होणारी शेती मशागत कालबाह्य होत आहे. शेती कामासाठी लागणारी सर्व लोखंडी अवजारे मिळत आहेत. लाकडी अवजारांची वाढती किंमत, मजुरी व दुरुस्तीचा खर्च अधिक ठरत आहे. तसेच लाकडी अवजारे दोन–तीन वर्षांनी खराब होत असल्याने शेतकरी लोखंडी अवजारे वापरत आहेत. लाकडी अवजारांच्या तुलनेत लोखंडी अवजारे अधिक उपयुक्त ठरत आहेत.पेरणीसाठी लागणारी  लाकडी नांगर, कुळव, पाभर, मैंग आदि वस्तू  ही आता कमी होत आहे, मुळात दिसेनासे झाले आहेत.जनावरे सांभाळणे कठीण झाल्यानेही शेतकऱ्यांकडून लोखंडी अवजारांनाच मागणी होत आहे.


महाराष्ट्र शासनांकडून www.mahadbt.maharashtra.gov.in च्या माद्यमातून ४० टक्वे अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेती व्यवसायात आलेल्या अत्याधुनिक साहित्यामुळे कधी काळी शेतकऱ्यांचा आवश्यक घटक म्हणून समजल्या जाणाऱ्या लोहार, सुतार कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. रेडिमेड अवजारांमुळे बलुतेदारी (सुतार व्यवसाय ) अडचणीत आला आहे. सध्या बैलजोडी च्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे बैलजोडी खरेदी करण्यापूर्वी शेतकरी विचार करीत आहेत. त्यातच शेतात मजूर मिळत नसल्याने शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरचा अधिक वापर होत आहे.



करंजगाव( साबळेवाडी) परिसरात शेताची पेरणी पाभर व बैलजोडीच्या साह्याने करताना टिपलेले फोटो. 

Post a Comment

0 Comments