मावळ जनसंवाद :- नाणे मावळात मोठ्या प्रमाणात दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडीत होत आहे. नाणे मावळ या भागात जांभवली, थोरण, शिरदे,पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी,गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडीवडे,नाणे,नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड,कचरेवाडी, घोणशेत व इतर वाड्या वस्त्या आहे. नाणे मावळात वीज गेल्यावर किमान ५ ते ६ तास येण्याची कोणतीच अपेक्षा नाही. नाणे मावळात गेल्या २५ ते ३० वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. तसेच विधुत डीपी बॉक्स नाही काही पोल वाकले आहे. काही जीर्ण झाले आहे. काही ता-या तुटलेल्या अवस्थेत आहेत. याबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रारी देऊनही महावितरण लक्ष देण्यास तयार नाही.
नाणे मावळात काही ठिकाणी ग्रामपंचायतच्या निवडणूक लागल्या आहे. ह्या महावितरणाच्या गांभिर्य समस्यामुळे येत्या ग्रामपंचायतच्या निवडणूकीवर याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. सनासुदी मध्ये आठ दिवसापासून रात्र दिवस नाणे मावळ विजेचा लपंडाव सुरुच आहे. मावळ तालुक्यात दिवाळी निमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना एन सनासुदीमध्ये विधूत पुरवठा खंडित होत आहे. ह्या कडे ना प्रशासन ना महावितरणचे अधिकारी लक्ष्य देण्यास तयार नाही हि वस्तू स्थिती आहे. काही ठिकाणी विधूत तारा ह्या लोमकळत पडलेल्या अवश्थेत आहे.तसेच कोंडीवडे ना.मा ते करंजगाव ला जाणारी विधूत लाईन सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी विधूत स्पार्क होत आहे. असे प्रश्न उपस्थीत होत आहे त्या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहे.
विधूत समस्या संदर्भात वारंवार सांगूनही कोणत्याच प्रकारची दखल घेतली जात नाही. अशी तक्रार नाणे मावळतील गावातील ग्रामस्थ करीत आहे.तसेच वारंवार होत असलेला विद्युत पुरवठा सनासुदीमध्ये सुरळीत करावा व कोंडीवडे ना.मा ते करंजगाव व मोरमारेवाडी ला जाणारी विधूत लाईन सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी विधूत स्पार्क होत आहे त्या ठिकाणी खात्रीशीर पाहणी करून ती समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.
0 Comments