Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

वडिवळे पाटबंधारे धरणावर महात्मा गांधी जयंती निमित स्वच्छता मोहीम..

 मावळ जनसंवाद :-  नाणे मावळातील महत्वाचे असे धरण वडिवळे धरण असून हे धरण १९७८ मध्ये बांधण्यात आले आहे,या धरणाची पाणी क्षमता १-४४ टी एम सी आहे. या धरणामुळे मावळ भागातील सुमारे सहा हजार हेक्टर परिसर पाण्याखाली आला आहे. विशेष करून आळंदी आणि देहू या तीर्थ क्षेत्रासाठी या धरणातून पाणी पुरविण्यात येते. वडिवळे धरणामुळे नाणे मावळ हा सुजलाम सुफलाम परिसर झाला आहे. गांधीजींच्या जन्मदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ ही एक जन चळवळ सुरू केली. स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असले पाहिजे, हे आपल्या आचार-विचार नि कृतींमधून अनेकदा राष्टपिता महात्मा गांधीजींनी दाखवून दिलेले आहे. 

          


आज वडिवळे पाटबंधारे धरणावर महात्मा गांधी जयंती निमित स्वच्छता मोहीम राबवून धरण लगत असलेला परिसर साफ करण्यात आला. त्यावेळी वडिवळे  पाटबंधारे  शाखा  अधिकारी शिंदे रावसाहेबबाळकृष्ण नामदेव शेलार, तुकाराम लक्ष्मण कोंढरे, नाथा दामू भोंडवे, रामचंद्र तुकाराम जांभूळकर, गबळू किसन कोंढरे,राम विठठल रंगडे, संजय चितकारा आदि मोठ्या संख्येने कामगार पस्थित होते.  

                          वडिवळे धरणावर स्वच्छता  करताना ठीपलेला फोटो.

Post a Comment

0 Comments