मावळ जनसंवाद :- मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा होत आहे. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना सनासुदीमध्ये विधूत पुरवठा खंडित होत आहे. ह्या कडे ना प्रशासन ना महावितरणचे अधिकारी लक्ष्य देण्यास तयार नाही हि वस्तू स्थिती आहे. काही ठिकाणी महावितरणाचे विधुत डीपीला बॉक्स नसल्याने अपघाताचा धोका वाढला असुन त्या कडे महावितरण चे आधिकारी तसेच कर्मचारी लक्ष्य देण्यास तयार नाही.तसेच नाणे मावळात महावितरणच्या बरेच डीपी ही रस्त्या बसुन काही अंतरावर असल्याने ह्याच रस्त्यावरून जनावरे, वाहने,विद्यार्थी ये जा करतात विधुत डीपी बॉक्स नसल्याने धोका निर्माण होवू शकतोय.शिवाय डीपी हे जमिनीपासून 3 ते 4 फुट अंतरावर असल्याने सहजा सहजी स्पर्श होऊ शकतो. नाणे मावळात विधुत समश्या मोठ्या प्रमाणावर असल्याने अपघाताचे प्रमान वाढले आहे. शिवाय ह्या समस्या मुळे मनुष्याचा अनेक ठिकाणी जनावरांनाचा जीव गमवावा लागला आहे.या समस्या नाणे मावळातील गावांमध्ये तसेच इतर वाड्या वस्त्या विधूत समस्या मोठ्या प्रमाणात असून महावितरण या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. या दुर्लक्षा मुळे शेतकरी बांधवांना विनाकारण नुकसान सोसावे लागते. तसेच काही ठिकाणी लाईट चे पोल हे वाकलेले आहेत. तसेच काही गावात मध्ये विधूत डीपी उघड्या आहेत.शिवाय दिवसातून पाच ते सहा वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. याकडे महावितरण लक्ष्य अथवा चौकशी सुद्धा करीत नाही. या प्रकारचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी विधूत तारा ह्या लोमकळत पडलेल्या अवश्थेत आहे.तसेच कोंडीवडे ना.मा ते करंजगाव ला जाणारी विधूत लाईन सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी विधूत स्पार्क होत आहे. असे प्रश्न उपस्थीत होत आहे त्या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहे.
0 Comments