मावळ जनसंवाद :- नाने मावळात जाणारा कामशेत-जांभवली रोडवरील खड्ड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. ह्या रोडवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात तात्पुरती दुरुस्ती केली जाते मात्र पुन्हा पाऊस काळात जैसी थी स्थिती होती. त्यामुळे नागरिक या खड्ड्यांना पासून अतिशय त्रस्त झालेले आहे.पावसाळ्यापूर्वी या रोडचे काम न झाल्यामुळे पहिल्याच पावसाच्या पाण्याने खड्डे भरून राहिल्याने तेथून येजा करणाऱ्या नागरिकांना प्रवासात अडथळे निर्माण होत आहे. नाने मावळातील भागातील नागरिकांसाठी कामशेत ही प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त प्रमाणात असते त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांना या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.वाहने पाण्यातून इजा करणाऱ्या रस्त्याच्या पायी चालणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाणी उडते त्यातून किरकोळ वाद होतात पाण्यातून गाडी घेऊन जाताना दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडत आहे.खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न निर्माण होत आहे. नाने मावळातून हा कामशेत परिसरातील नागरिकांसाठी ये-जा करण्याचा प्रमुख मार्ग असल्याने येथे राहणारी वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. ह्याच रस्त्यावरून मोठ्यां प्रमाणात पर्यतन येत असते. संबंधित प्रशासनाने हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिकि-या :- गाडी चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.पदचार्यांच्या अंगावर पाणी उडून किरकोळ वाद होत आहे तर दुचाकी घसरून किरकोळ अपघाती होतात तरी संबंधित प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करावा.अशी माहिती संतोष विष्णू गायकवाड यांनी दिली.
0 Comments