मावळ जनसंवाद :- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वसलेला मावळ तालुका विलोभनीय सृष्टीसौंदर्य नटलेला आहे.पवन,नाणे आणी आंदर अशा तीन विभागामधे मावळ तालुका विखुरला असून .पुणे आणी मुंबई ही महानगरे जवळ असल्यामुळे तालुक्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.जमिनींना सोन्याचा भाव आला आहे.तालुक्याची शहरीकरणाकडे झपाट्याने वाटचाल सुरू असताना देखील शेतकरी बांधव शेती करण्याचे सोडत नाही हि वस्तू स्थिती आहे. मावळ तालुका हा भात पिकासाठी अग्रेसर आहे.भात हे पिक मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतामध्ये घेत आहे.मावळ तालुका हा भात पिकांचे कोठार म्हणून ओळखला जातो. मावळ तालुक्यात मागील वर् षी सुमारे १३ हजार ५०० हेक्टरवर भात पिकांची लागवड करण्यात आली होती.परंतु ह्या वर्षी पाऊस हा उशिरा चालू झाल्यामुळे मावळ तालुक्यात भात लागवड चालू आहे.
मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक ओढे- नाले यांच्या जमिनीच्या हव्यासापायी मार्ग बदल्याने स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.नैसर्गिकपणे वाहणारे ओढे- नाले यांचा मार्ग बेकायदा रोखून इतरत्र वळवल्यामुळे ठिकाणचे शेती क्षेत्र अडचणीत आले आहे, शेतजमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. धनदांडग्यांच्या जमिनीच्या हव्यासापोटी सर्वसामान्य शेतकर्यांना तसेच स्थानिक नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या भागातील भात शेतीला याचा फटका बसला असून भात रोपे करपून गेली आहेत. शेतात तीन ते चार फुट पाणी साचले असल्याने भातलावणी करणे कठीण झाले आहे. कामशेत- जांभवली या रस्ता खचून मोठ मोठ खड्डे पडले आहेत, दुचाकी चालकांना पाण्यातून जाताना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन किरकोळ जखमी होत असताना ह्या कडे ना प्रशासन ना लोक प्रतिनिधी ह्याकडे कोणी लक्ष देत नाही असा आरोप स्थानिक शेतकरी करीत आहे.
विनाअनुदानित शेततळे : पाण्याचा निचरा होत नसल्याने गोवित्री हद्दीमध्ये अनेक शेतामध्ये अशी विना अनुदानित शेततळी तयार झाली असून शेतक-यांचे नुकसान होत आहे.
0 Comments