मावळ जनसंवाद :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबरोबर एक नोव्हेंबर २००५ पूर्वीचे नियुक्त शिक्षकांच्या पेन्शन साठी आज मा आमदार दत्तात्रय सावंत सर मा. आमदार देशपांडे साहेब आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब व समाधान घाडगे सर व समन्वय समितीचे सदस्य यांची चर्चा होऊन मुख्यमंत्री यांनी जुनी पेन्शन देण्याचे मान्य करण्यात आलेला आहे आज तमाम महाराष्ट्रातील २६८०० शिक्षकांना न्याय देण्याचे काम सावंत सरांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेला आहे.
शालेय शिक्षण विभागाचतील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु १ नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार - मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे
दिनांक १३ मे माजी आमदार दत्तात्रय सावंत,माजी आमदार श्रीकांत देशपांडे आणि जुनी पेन्शन योजना समन्वय संघाचे नेते सुनील भोर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे ३ मे २०२३ पासून महाराष्ट्रातील 1 नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु २००५ नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू झाले होते. शासन कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही म्हणून आंदोलनाच्या 9 व्या दिवशी मा आमदार दत्तात्रय सावंत यांनी आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा शासनाला दिला आणि प्रत्यक्षात आंदोलन सुरू देखील केले आमरण उपोषण सुरू केल्याची दखल शासनाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना तात्काळ बैठक घेऊन श्री सावंत यांना उपोषणापासून परावृत्त करावे अशा प्रकारचे आदेश दिले. श्री केसरकर यांनी दत्तात्रय सावंत सावंत ,सुनील भोर,समाधान घाडगे मारूती गायकवाड या सर्वां सोबत चर्चा करून सध्या आमरण उपोषण करू नका सोमवारी आपणाला मुख्यमंत्री बोलावणार आहेत अशी विनंती केल्यामुळे सावंत यांनी आमरण उपोषण एक दिवसानंतर मागे घेतले. आज तेरावा दिवस होता तेराव्या दिवशी मुख्यमंत्री कार्यालयातून ५ वाजता सह्याद्री अतिथीग्रहावर शिष्टमंडळाला शासनाचे बोलावणे प्राप्त झाल्यानंतर सर्व शिक्षकांत आनंदी व उल्हासाचे वातावरण तयार झाले. सायंकाळी ५.३० वाजता मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली बैठक तब्बल ३० मिनिटानंतर म्हणजे सहा वाजता संपली या बैठकीत आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे ,माजी आमदार दत्तात्रय सावंत ,माजी आमदार श्रीकांत देशपांडे जुनी पेन्शन समन्वय संघाचे सुनील भोर ,श्री वाले सर ,कल्याण बरडे, प्रसाद गायकवाड समाधान घाडगे सचिन नलावडे श्री मारुती गायकवाड, शिवाजी चव्हाण ,राजेंद्र आसबे,हे उपस्थित होते. झालेल्या चर्चेच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सर्व कर्मचारी हे १ नोव्हेंबर २००५ च्या पूर्वीचे असल्यामुळे यांना जुनी पेन्शन योजनाच दिली पाहिजे, अशी त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले ,थोडासा शिष्टाचार पाळल्यानंतर वित्त विभागाचा सल्ला घेऊन मी आपणाला जुनी पेन्शन योजना १०० टक्के देणार आहे. चर्चा यशस्वी झाल्यामुळे आणि शिष्टमंडळातील प्रत्येक सदस्याचे समाधान झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती
शिष्टमंडळाने मान्य केली. मुख्यमंत्र्यांनी याचवेळी या संबंधात नस्ती सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे भारताच्या बाहेर असल्यामुळे ते आल्यानंतर संबंधित नसती सादर होऊन त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे .निर्णय १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने असेल असा विश्वास शिष्टमंडळाला आल्यामुळे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ,माजी आमदार श्री दत्तात्रय सावंत माजी आमदार श्रीकांत देशपांडे जुनी पेन्शन समन्वय संघाचे पदाधिकारी यांनी आझाद मैदानावर जाऊन हजारो शिक्षकांसमोर त्यांच्या साक्षीने त्यांना विचारून आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. याचवेळी ३१ मार्च २०२३ रोजी शासनाने जो १ नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांकरता जो तीन लाभाचाआदेश काढला आहे. तो आदेश १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना लागू राहील आणि त्यासंबंधीचा एक अध्यादेश तात्काळ काढण्यात येईल असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.या आंदोलनात राज्यभरातून हजारो शिक्षक यांनी दररोज हजेरी लावली .यामध्ये प्रकर्षाने मावळ तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील जुनी पेन्शन पिडीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आझाद मैदानावर अधिकाधिक उपस्थीती ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे समन्वयक कल्याण बर्डे, अनंतराव गर्जे ,शंकर धावणे यांनी विशेष प्रयत्न केले तसेच उपस्थित शिक्षक बांधवांना मार्गदर्शन करुन एक जुनी पेन्शनवर आधारित स्वरचित कविता देखील सादर केली.
एकच मिशन! जुनी पेन्शन !
जाऊनिया आंदोलना तुवा काय केले !
अवघे मैदानच फुलुन गेले !
चार सहा हजार जण आले !
घोषणांनी मैदानच दुमदुमून गेले !! १ !!
जुनी पेन्शनच्या निश्चयाचा महामेरु !
सावंत सर सर्व शिक्षकांचा आधारु !
तुटो हे शरीर फुटो हे मस्तक !
जुनी पेन्शन हाच एक दस्तक
!! २ !!
महाराष्ट्रातून सर्व शिक्षक आले !
आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले !
पदाधिकारी आले आमदार आले !
आपणा सर्वांना बळ देऊन गेले
!! ३ !!
आंदोलन स्थळी जे मुक्कामी राहीले !
त्यांनीच तर आपले भले भले केले !
हे सर्व सारे ते का विसरले !
जे शिक्षक घरी- दारी राहिले
!! ४ !!
एकच आहे आयुष्यभर टेंशन !
कधी मिळायची जुनी पेन्शन !
म्हणूनच केलयं एकच मिशन
जुनी पेन्शन जुनी पेन्शन
!! ५ !!
यासाठी मंत्रालयात बोलावणारच !
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारच !
जुनी पेन्शन मिळवणारच !
हाती परिपत्रक घेणारच
!! ६ !!
कवी : श्री.शंकर धावणे
एम.एस्सी.बी.एड.
स्वाती कविता संग्रह
बुधवार १० मे २०२३
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर ,सांगली ,सातारा ,कोल्हापूर , विदर्भातील यवतमाळ, अमरावती वाशिम, बुलढाणा, अकोला मध्य महाराष्ट्रातील जळगाव ,अहमदनगर नांदेड येथून मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा देखील मोठा सहभाग नोंदवला गेला .त्या सर्वांचे
प्रसाद गायकवाड यांनी आभार मानले.
0 Comments