Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

पुणे टॅलेंट सर्च एक्झाम परीक्षेतील गुणवंतांचा गौरव ..!

मावळ जनसंवाद :- ह.भ.प.आ.ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी. प्रशालेत पुणे टॅलेंट सर्च एक्झाम परीक्षांचे गुणपत्रक व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला असून प्रगती. विद्या मंदिर व ह .भ.प.आ.ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी.या प्रशालेत पुणे टॅलेंट सर्च एक्झाम चा पारितोषिक वितरण समारंभ उत्साह पूर्ण आणि आनंदात संपन्न झाला.

या परीक्षा संदर्भात  विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी इयत्ता अकरावीमधे प्रवेश घेतानाच आपल्या भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी कोणत्या शाखेलाआपल्याला प्रवेश घ्यावयाचा आहे.कोणते विषय घेऊन आपण आपले करिअर करू शकतो या संदर्भात अनेक मान्यवर व्यक्तींचा नाम उल्लेख करून त्यांनी आपले करिअर कसे घडविले पाहिजे आणिआपण त्यांचेअनुकरण करूनआपला भविष्यकाळ कसा बदलला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन केले.नियोजनबद्ध व अखंड सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास नक्कीच या स्पर्धा परीक्षा  मध्ये उत्तम गुण प्राप्त करता येतात.या समारंभाला मावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.सुदाम वाळुंज, गटविकास अधिकारी  मा.श्री.सुधीर भागवत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज साहेब यांनी तालुक्यांमध्ये गणित विषयाच्या संघाप्रमाणे इतर विषयांचे  संघ सुध्दा कार्यरत राहीले पाहिजे असे मत व्यक्त केले .प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या .जिल्हा गणित अध्यापक संघाचे पदाधिकारी भारत काळे यांनीअध्ययन-अध्यापना विषयी मौलिक मार्गदर्शन केले. जिल्हा गणितअध्यापक संघाचे पदाधिकारी डी.एच शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.समन्वयक संदिप लोणकर,सचिन धनवट, मुख्याध्यापक आबा जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील गणित शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा प्रचंड असा प्रतिसाद लाभला . महाराष्ट्र राज्य  शाळा कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री कल्याण बर्डे यांनी अध्यक्षस्थान भुषविले.त्यांनी मावळ तालुका गणित कार्यकारणीने केलेल्या कामाचे कौतुक केले आणि बहुमोल असे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरावाचे योगदान याविषयीचे सविस्तर विवेचन केले. 


        मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री विठ्ठल माळशिकारे, तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष शंकर धावणे यांनी तालुका गणित अध्यापक संघाच्या पंधरा वर्षांपासूनच्या कार्याचा आढावा व पुढील कार्याची दिशा विशद केली, प्रशालेचे प्राचार्य सुदाम वाळुंज यांनी गणित अध्यापक संघाच्या कार्याची माहिती दिली.या गुणगौरव सत्कार सोहळ्यात मावळ तालुक्यातील ४३ माध्यमिक  विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व गणित अध्यापकांचा सत्कार करण्यात आला.या सत्कार समारंभास गणित अध्यापक संघाच्या उपाध्यक्षा रेखा परदेशी,  गणपत कायगुडे, बापूसाहेब पवार,फुलपगारे मॅडम,अहिरराव सर,कडुसकर मॅडम ,पठाण सर,गादेकर सर, गायकवाड सर,बारबोले सर,भंडारी सर, मावळ तालुका गणित अध्यापक संघाच्या कार्य - कारिणीचे सर्व सदस्य, काकासाहेब भोरे ,वंदना मराठे, प्रशालेचे शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मण मखर,सहशिक्षिका वैजयंती कुल सर्व तालुका प्रतिनिधी विविध शाळांचे मुख्याध्यापक सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक यांचीही यावेळी उपस्थिती लाभली .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेचे सर्व कर्मचारी जेष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक पर्यवेक्षक या सर्वांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाची सर्व तयारी मच्छिंद्र बारवकर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित संघाचे अध्यक्ष शंकर धावणे, सूत्रसंचालन सुनिता दांगट यांनी केले तर आभार रेखा परदेशी यांनी मानले.या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे संपूर्ण आयोजन  


पुणे जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा.सौ.सुनंदा वाखारी मॅडम यांच्या परवानगीने पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ व मावळ तालुका गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती मावळ व मावळ तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष तसेच राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तज्ञ मार्गदर्शक प्रा.श्री.शंकर धावणे सर यांनी केले.


       

Post a Comment

0 Comments