मावळ जनसंवाद :- कोंडीवडे ना.मा येथील आदर्श व्यक्तिमत्व, संत तुकाराम पादुका ट्रस्टचे सचिव कै.विष्णू किसन गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त मोफत आरोग्य तपासणी हा उपक्रम राबविण्यात आला. श्रीमती.लीना कवितके, कवितके हॉस्पिटल कामशेत यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह तपासणी मोफत, मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत रक्त तपासणी, मोफत ओषधे वाटप करण्यात आली आहे. त्यावेळी गावातील मान्यवर भरत गायकवाड,संतोष गायकवाड,अंकुश गायकवाड, बाजीराव दाभणे,अनिल गायकवाड, मारुती पठाडे,सदाशिव दाभने, रोहन देशमुख आदि ग्रामष्ठ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष करून महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. .
0 Comments