मावळ जनसंवाद :- नाणे मावळातील पश्चिम भागात कामशेत - जांभवली ह्या रस्त्यालगत करंजगाव व कांब्रे ना.मा येथील हद्दीमध्ये साकव पुलाला दोन्ही बाजूला कठडा नाही. कठड्यावरून रात्रीच्या वेळेस चारचाकी वाहन पडून अपघात झाले आहेत. सदरचा पूल हा सध्यास्थितीत धोकादायक बनत चालला आहे. हा पूल जीर्ण झाला असून पावसाळामध्ये ह्या पुलावरून काही वेळा पुलावरून पाणी जाते. त्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क बंद होतो. हा पूल अरुंद असल्यामुळे वाहने चालवताना प्रवाशांची तारांबळ होते. ह्या पुलाच्या समोर वळण असल्यामुळे रात्रीच्या वेळेस प्रवास करताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. शिवाय समोरून आलेल्या वाहनांचा भरोसा लागत नाही. ह्या जीर्ण साकव पूल वाहन चालक व प्रवाशांच्या जीविताशी खेळ असून ह्या पुलाचे काम प्रशासनाने हाती घ्यावे.
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहे. या पुलावरून रोज अनेक वाहने तसेच जडवाहतूक ये- जा करीत असतात. या असुरक्षित साकव पुलावर होत असलेल्या जीवित हानी बघतावर कार्यवाही करण्याची मागणी सध्या नाणे मावळातील नागरिक करीत आहे.
प्रतिक्रिया :- हा पूल बऱ्याच दिवसाचा असून हा जीर्ण होत चालला आहे. सुद्धा या रस्त्यावर नव्या पुलाच्या बांधणी करीता प्रशासनने लवकरात लवकर पाहणी करून पावसाळ्यापूर्वी काम चालू करावे जेणेकरून ह्या साकव पुलावर अपघात होणार नाही. अशी माहिती उद्योजक श्री.नामदेव कोंडे यांनी दिली .
कांब्रे ना.मा व करंजगाव येथील हद्दीमध्ये साकव पुलाला दोन्ही बाजूला कठडा नसताना टिपलेला फोटो
0 Comments