Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

ज्वारीचे पिक जोमात...!

 मावळ जनसंवाद :-  नाणे मावळातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात ऊस हे पिक केले जाते परंतु ऊस पिकाबरोबर ज्वारीचे हे पिक शेतकरी बांधव घेत आहे. तर काही शेतकरी वाटणा, मसूर, गहू, फुल शेती, फळ शेती इत्यादी पिके घेतली जातात.मागील आठवड्यात अवकाळी पाऊसाने एकीकडे काही शेतकऱ्यांनी झेंडूची शेती तर फळ शेती व इतर पिके शेतकऱ्याच्या हातात येणाऱ्या झेंडूच्या फूलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस हा ज्वारीच्या पिकाला पोषक झाला आहे.त्यामुळे ज्वारीचे पिक हे जोमात आले आहे. सध्या नाणे मावळ परिसरात हुरड्याचा हंगाम चालू आहे. तर ज्वारीच्या कडब्याचा जनावरांच्या चा-या साठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. कडब्याची एक पेंढी ची किमत २५ रुपये दराने विक्री केली जाते. त्यामुळे शेतकरी  बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.  



                      
 नाणे येथे 
ज्वारीचे पिक हे जोमात आले असताना टिपलेले फोटो 

                     

Post a Comment

0 Comments