Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नाणे मावळात भात काढणीला वेग

 मावळ जनसंवाद :-  मावळ तालुक्याच्या पश्चिम भागातील भात हे प्रमुख पीक आहे.  या मावळ  तालुक्यात भात पिकांचे मोठे क्षेत्र आहे.  बहुतांश भात शेतीसाठी शेतकऱ्यांनी इंद्रायणी वाणाची निवड केली जाते. येथील हवामान पिकांना पोषक असल्याने येथील तांदळाची चव जिभेवररे गाळल्याशिवाय राहत नाही. भात पिकाचे वाढलेले क्षेत्र आशादायक आहे. भाताचे दर हंगामापेक्षा चांगले असल्याने वाढली आवक दरम्यान, भात पिकाला हंगामात चांगला दर मिळवा, यासाठी मावळ तालुक्यातील शेतकरी प्रयत्नशील आहे.नाणे मावळातील शेतकरी बांधवानी सेंद्रिय खतावर भर दिला आहे. त्यामुळे भाताची किंमत बाजारपेठे पेक्षा जास्त मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.सध्या भाताचे दर हंगामापेक्षा चांगले असल्याने बाजारात भाताची आवक वाढली आहे. सुहासिक इंद्रायणी, कोळम लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.
             



सुरवातीच्या संकटातून दमदार आलेल्या भात पिकांचे परतीच्या पावसामुळे काही भागामध्ये  मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेले भात पीक आडवे झाले आहे. या संकटातून बचाव झालेल्या भात पिकांची सध्या काढणीस वेग आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी मजुर टंचाई हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे. एकाच वेळेस बहुतांश शेतकऱ्यांची भात काढणी सुरू झाल्यामुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाणे मावळातील पश्चिम भागात पिक काढणीला आले आहे. परंतु शेतामध्ये अजून पाणीच साचले आहे. काही ठिकाणी पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीच्या क्षेत्राचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत द्यावी, अशी मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली.   

Post a Comment

0 Comments