Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

वडिवळे धरण परिसरात बनू लागलाय दारूड्यांचा अड्डा.

 मावळ जनसंवाद :-  मावळ तालुक्यातील नाणे मावळात असणारे वडिवळे धरण हे महत्वाचे मानले जाते. हे धरण हे १.४४ टी एम सी क्षमतेचे धरण आहे. या धरणाची निर्मिती १९७८ मध्ये करण्यात आली. धरणाची  पाणीसाठा क्षमता ४०.८७ दशलक्ष घनमीटर असून, उपयुक्त पाणीसाठा ३०.३९ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाचा कालवा व नदीपात्र द्यारे खरीप,रब्बी व उन्हाळी पिकासाठी सुमारे सहा हजार हेक्टर पाणलोट क्षेत्र आहे. त्यामुळे परिसरातील गावे सुजलाम सुफलाम झाली आहेत. ह्या जीवदानी धरणाच्या परिसरात मद्यपान यासाठी अनेक दारुड्या पर्यटक येत असतात. सायंकाळच्या सुमारास दारुदे  पर्यटक, निसर्गरम्य जलाशय पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मात्र अलीकडे पर्यटक सोबत दारूच्या बाटल्याही नेऊ लागल्याने परिसरात दारूच्या बाटल्या दिसत आहे ही वस्तुस्थीती आहे. धरण परिसरात अनेक अनधिकृत  फार्म हाउस  आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्या  होत आहे. त्या कडे ना पोलीस प्र्शासन, ना पाटबंधारे खात्याचे कर्मचारी लक्ष देण्यास तयार नाही. हि वस्तू स्थिती आहे.                  धरण परिसरात अनेक अनधिकृत फार्म हाउसमध्ये मोठ्या प्रमाणात धिंगाना होत आहे. त्या कडे प्र्शानाचे दुर्लक्ष होत होते. धरण परिसरातून  जाताना आजूबाजूच्या रहदारी सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. 

        वडिवळे धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांना हिसका दाखवला पाहिजे.दारुड्यांचा उच्छाद थांबवण्यासाठी दारुड्या पर्यटका विरुद्ध मोहीम राबविली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. 

Post a Comment

0 Comments