Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

नवरात्र उत्सव जानुबाई देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भावीक मोठी गर्दी ......

 मावळ जनसंवाद :- गेले दोन वर्षापासून दर्शनासाठी मंदिर बंद होती मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मावळ तालुक्यातील कामशेत पासून काही किलोमीटरच्या अंतरावर चिखलसे गावालगतच्या डोंगरावर गेले अनेक शतकांपासून जानुबाई देवीचे जागृत देवस्थान असून, नवरात्र उत्सवात देवच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याची  दिसून आले या दिवसात येथे भाविकांची मोठी जत्राच भरत आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या पुढाकाराने  या देवीच्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.मात्र मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांना कसरत करावी लागत आहे.   



    काही वर्षापासून नवरात्र उत्सव जानुबाई देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भावीक मोठी गर्दी करीत आहेत.चिखलसे, आहिरवडे,नायगाव,साते,ओझर्डे,सडवली व बऊर या सात गावांच्या शिवेवर म्हणजेच चिखलसेशेजारील समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंच असलेल्या डोंगरावर अनेक वर्ष दुर्लक्षित असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी सध्या भाविकांची गर्दी वाढली आहे. जानुबाई देवीचे हे देवस्थान अतिप्राचीन असून, जुन्या मंदिराचे अनेक अवशेष डोंगर परिसरात विखुरलेल्या अवस्थेत पहावयास मिळतात. स्थानिक ग्रामस्थांनी तीन ते चार वर्षात या मंदिराची पुनर्बांधणी केली आहे, तरी मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भाविकांना डोंगरावर पायी जावे लागते. पूर्वी जानुबाई देवीचे दगडी चौथऱ्यावर मोकळे मंदिर होते.या मंदिरा शेजारी प्राचीन दीपमाळ असून हिच्यावर मोठा दिवा लावला जायचा. मंदिर परिसरात प्राचीन पाण्याची टाकी, पिरघळी, देवीला वाहण्यात येणारे दगडी नंदी, मंदिराचे जुने अवशेष असून या मंदिराच्या पूर्वेकडे जाईबाई माता, वाघजाई, पश्चिमेला केदारनाथ,बैंराई, दक्षिणेला पद्मावती देवी व उत्तरेला जाखमाता ही देवस्थाने आहेत.                                                      नायगाव येथील नागनाथ देव हा जानुबाई देवीचा भाऊ असल्याने व तो सर्प रूपात देवीच्या दर्शनासाठी आजही येत असल्याने, तसेच इतर अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. या मंदिराचा जीर्णद्वार करताना काळभैरवाची मूर्ती व इतर अनेक अवशेष सापडले आहे. ------- श्री.लहु चोपडे  चिखलसे सोसायठी                                                                                                                                                                                         सध्या मंदिरापर्यंत ग्रामस्थांनी तात्पुरता रस्ता केला असला, तरी वाहने मंदिरापर्यंत जात नसल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना डोंगराच्या पायथ्याशी मोठी वाहने लावून डोंगर पायी चढावा लागतो आहे. तर दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागते. -------- सौ.सविता सोमनाथ काजळे  उपसरंपच चिखलसे

Post a Comment

0 Comments