मावळ जनसंवाद :- गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पाऊसामुळे नाणे मावळातील भात पिके जोमात आली आहे. सर्वत्र हिरवेगार रान दिसत आहे. भात पिके वाऱ्याच्या झुळकेने डोलताना दिसतात. दरवर्षा प्रमाणे यंदा अधिक लावणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. धरण परिसरात सधन शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था केल्याने डोंगराच्या पायथ्याशी भात लावणी झाली आहे. नाणे मावळातील कामशेत, वडगाव, लोणावळा, इतर तालुक्याच्या तांदळाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. येथील हवामान पिकांना पोषक असल्याने येथील तांदळाची चव जिभेवररे गाळल्याशिवाय राहत नाही. भात पिकाचे वाढलेले क्षेत्र आशादायक आहे. धुव्वादार पावसामुळे धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणी टंचाईच्या झळा कमी होणार आहेत. भाताचे दर हंगामापेक्षा चांगले असल्याने वाढली आवक दरम्यान, भात पिकाला हंगामात चांगला दर मिळवा, यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे.नाणे मावळातील शेतकरी बांधवानी सेंद्रिय खतावर भर दिला आहे. त्यामुळे भाताची किंमत बाजारपेठे पेक्षा जास्त मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
0 Comments