Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

सामाजिक भान जपणारा एक गाव एक गणपती ..

मावळ जनसंवाद :- एक गाव, एक गणपतीची परपर मागील ४१ वर्षापासून सुरु असून या गणेशोत्सवातून ग्रामस्थानी नवा आदर्श केला आहे. डोंगराच्या कुशीत आणि पुंडलिका नदीच्या तीरावर वसलेले निसर्गरम्य थोरण ह्या गावाने एक गाव, एक उत्सव या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. गणेशोत्सवाच्या  संकल्पनेचा आदर्श  ह्या गावाने  मावळ  तालुक्यात  निर्माण करून दिला आहे. दरवर्षी गावातील सर्व कुठूब एकोप्याचा संदेश देत एकत्रित येत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. त्यामुळे थोरण गावच्या या सामाजिक एकोप्याचे मावळ तालुक्यात  सर्वत्र कौतक होत आहे.गणेशोत्सव म्हटलं कि, जिथ नजर जाईल तिथे बाप्पाचे दर्शन घडत. मग गावागावात असो वाड्या वस्त्या असो किवा आली मध्ये जिथ - तिथ घरोघरी आणि सार्वजनिक मंडळाचे गणपती दिसून येतात. मावळ तालुक्यात घरोघरी दीड,अडीच आणि पाच दिवसाचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अनंत चतुर्थी दिवसापर्यंत बाप्पाची स्थापना होते. मात्र एक गाव, एक गणपती सारखी संकल्पना काही ठिकाणी दिसून येते.अशीच एक गाव. एक गणपती ची संकल्पना मावळ तालुक्यातील थोरण गावान गेल्या ४१ वर्षापासून अविरतपणे सुरु ठेवली आहे. 

          गेल्या ४१ वर्षापासून  थोरण गावातील सर्व नागरिक ग्राम्ष्ठ एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव, गोपाळकाला, नवरात्रोत्सव यासह सर्व सन आनंदाने साजरे करत आहे. साधरण पणे अंदाजे ५५०  लोकसंख्या असलेल्या या गावातील एक गाव, एक गणपती उत्सवाचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. गणपती  उत्सवात विविध सांकृतिक कार्यक्रमाचे व खेळाचे आयोजन केले जाते.कोणत्याही घरी घरगुती गणपती प्रतिस्थापना  केली जात नाही. सपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येत सर्व उत्सव साजरे करतात. दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गावामध्ये आरती सपन्न झाल्यानंतर सर्वांना प्रसाद दिला जातो. एक गाव, एक गणपती हा गणेशोत्सव साजरा करताना गावक-यामध्ये नवचैतन्य संचारले आहे. 




Post a Comment

0 Comments