Header Ads Widget


Flash news

2/recent/ticker-posts

गावोगावी फिरता दवाखाना चालू करण्याची होतंय मागणी

 मावळ जनसंवाद :- नाणे मावळात  मोठया  प्रमाणात  वाड्या  वस्त्या असून  त्या ठिकाणी  लोक वस्ती  मोठया प्रमाणात आहे.आजच्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. पाऊसाबरोबर मोठ्या प्रमाणात हवा येत आहे. अशा प्रकारे वातावरण या मध्ये बदल जाणवत असल्याने दिसून येत आहे. नदी नाले डोंगर काही प्रमाणात पाण्याने वाहत आहे, विहीरी, नदीचे पानी  हे गंडूल झाले आहे हे पानी थेट घराघरा मध्ये जाते त्या मुळे आजारी  व्यक्तींचे  प्रमाण वाढले आहे. त्या मध्ये सर्दी , डोके, ताप , हागवन, अदि आजार  मोठया प्रमाणात पुरुष - महिला  याना होत आहे. नाणे मावळात  असा  कोणताही शासकीय  दवाखाना  नाही .  पूर्वी  करंजगाव   ठिकाणी  खडकाळा  आरोग्य  केंद्राचे उपकेंद्र  होते.  आज  त्या ठिकाणी  उपकेंद्रावर् ड्रॉकटर वेळेवर येत नाही.अशी नागरिकांची तक्रार आहे.शिवाय नाणे मावळचे शेवटचे टोक हे जांभवली  आहे. तेथील  एखादा  रुग्ण  आजारी असेल  तर  अंदाजे २०- २२ किलो  प्रवास करन कामशेत या ठिकाणी  सरकारी अथवा  खाजगी दवाख्यानात  घेऊन जावे  लागते  हि परिस्थिती आहे.  त्या  खाजगी  ठिकाणी  डॉक्टर फी  तपासयाला  १०० ते २०० रूपे फी घेतली जाते. शिवाय गोळ्या औषधे  यांचा खर्च अंदाजे 3०० रुपये, सलाईन  खर्च वेगळाच असा मिळून १००० रुपये खर्च येतो. हा खर्च सर्व सामान्य  व्यक्तींना परवडणारा नाही त्या मुळे आरोग्यावर  खर्च  करून  शेतकरी  बांधव सर्व सामान्य नागरिक  हतबल झाला आहे.                                                                                                        प्रशानाने नाणे मावळातील उपकेंद्रवर अंकुश ठेवण्यात यावे. करंजगाव उपकेंद्र व्यतिरिक्त अन्य गावामध्ये दुबार उपकेंद्र निर्माण करावे जेणे करून सर्व सामान्य व्यक्तींची आरोग्याशी हेळसांड होणार नाही. तसेच गावोगावी फिरता दवाखाना चालू करावा त्यामुळे खाजगी दवाखान्यातला होणारा खर्च  सुद्धा  कमी  होईल. अशी  नागरिकांची मागणी आहे.   

Post a Comment

0 Comments